समविचारी माणसं एकत्र आल्यास व्यवसायात यशस्वी होतात. (पत्रकार नगराज पाटील.)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०२/२०२२
समविचारी माणसं एकत्र आल्यास व्यवसायात यशस्वी होतात. असे मत कुरंगी येथील समर्थ दुध डेअरीच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना पत्रकार नगराज पाटील यांनी व्यक्त केले.
कोणत्याही लहान मोठ्या उद्योग व्यवसायात समविचारी माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते नक्कीच यशस्वी वाटचाल करतात. याचेच जिवंत उदाहरण म्हणजे समर्थ दुध संकलन केंद्र कुरंगी या संस्थेच्या व्दितीय वर्धापनाच्या कार्यक्रमात पत्रकार नगराज पाटील यांनी दुध उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
भरूच (गुजरात) दुध संघाच्या कुरंगी संस्थानचे यशस्वी पणे दिनांक ११ फेब्रुवारी रोजी दोन वर्षे पूर्ण झाली. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कॄषी उद्योजक समर्थ पशू खाद्याचे संचालक विशाल नेवे अध्यक्ष गावातील सरपंच पती गणेश संतोष पाटील, ग्रा.प. सदस्य योगेश ठाकरे, माजी सरपंच गजानन पवार, तंन्टामुक्तीचे नामदेव पाटील, विकास सोसायटी चे माजी चेअरमन संतोष पाटील, गावातील जेष्ठ नागरिक तापीराम पाटील, माधवराव पाटील, तानाजी पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी विशाल नेवे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शरद पवार, ज्ञानेश्वर पाटील, सुरेश पाटील, कैलास पाटील, योगेश पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.