एकास गुटखा विक्री करतांना मुद्देमालासह केली अटक पाचोरा

पाचोरा ( दिलीप जैन)
दिनांक ३१/१०/२०२० रोजी पाचोरा नगरपरीषद लगत असणाऱ्या किराणा दुकानात आरकमल बच्चामल चंदाणी रा.शिंधी काॅलनी जामनेर रोड पाचोरा, हे सांयकाळच्या वेळेस गुटखा विक्री करतांना आढळून आले.शासनाचे आदेश ढाब्यावर बसवत गुटखा विक्री सुरू असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांचा निदर्शनास आले. त्यावेळी दुकानाची झळती घेण्यात आली.त्यात ,६, हजार १२१ रूपयांचा गुटखा पान मसाला आढळून आला. त्या मुद्देमालासह गुटखा विक्री करणाऱ्यांला ताब्यात घेतले असून, पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई किशोर प्रकाश पाटील,यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आरकमल बच्चामल चंदाणी विरूद्ध गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.
आरोपीस न्यायालयात हजर केले असता.आरोपीस २नोंव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.सदर तपास निरीक्षक अनिल शिंदे यांचा मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास पाटील,व अन्य कर्मचारी करत आहेत.
ह्या कारवाई मुळे गुटखा विक्री करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अश्या प्रकारची कारवाई पाचोरा सह पंचक्रोशीतील गावात मध्ये करण्यात यावी अशी मागणी जानकार नागरिकांन मार्फत करण्यात येत आहे.