महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे अतिषजी चांगरे व सुरज भैरु सन्मानित.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०७/२०२१
दोन वर्षापासून कोरोना मुळे सर्व नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे घराच्या बाहेर निघायला सुद्धा भीती वाटत होती. कोरोनाचा सामना करतांना शासन, प्रशासन तसेच विशेष करुन पोलिस स प्रशासन व डॉक्टरांनी एकत्रित येऊ कोरोनाचा प्रादुर्भाव कसा थांबवता येईल याकरिता स्वताच्या जीवाची पर्वा न करता आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून जनतेच्या रक्षणार्थ स्वताला वाहून घेतले होतो असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
कारण ज्यांना कोरोनाची लागण झाली अश्या व्यक्तींना वाऱ्यावर सोडून जाणारे रक्ताच्या नात्यातील लोकही पहावयास मिळाले मात्र असे असलेतरी शासन, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, पोलिस व डॉक्टरांनी जीवाची बाजी लावून कोरोना बाधीतांची सेवा करतांनाच अनेकांना कोरोनाची बाधा होऊन जीव गमवावा लागल्याच्या बऱ्याच घटना घडल्या.
मध्यंतरीच्या काळात कोरोनामुळे अनेकांचे मृत्यू झाले. नातेसंबंध सर्व एकमेकापासून दूर झाले. कोणीही कोणाला भेटायला तयार नव्हते. कोणी कोणाच्या घरी सुख दुःखा मध्ये येण्यास तयार नव्हते. अशावेळी कोणी नातेवाईक वारले तर त्यांच्या घरी सुद्धा जायाला तयार नव्हते. विशेष म्हणजे कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर डॉक्टरांनी संबधितांना माहिती दिली तरी अंत्यविधी करुन टाका असे सांगून चार हात लांब रहाणारे आपले ते परके होतांना पहावयास मिळत होते.
अशावेळी पाचोरा शहर मध्ये मृत्यू झालेले व्यक्तींचा अंत्यविधी कसा करायचा कुणी करायचा हा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु याच कठीण काळात वडिलोपार्जित समाजसेवेचा वसा जोपासणाऱ्या परिवारातील सर्पमित्र, एक सच्चा समाजसेवक, निसर्गराजा न्यूजचे संपादक मा.श्री. अतिषजी चांगरे यांचा मुलगा सुरज भैरु व स्वता अतिषजी चांगरे यांनी आपण समाजाचे काही देणे लागतो याची जाणीव ठेवत पाचोरा शहरातीलच नव्हे तर तालुक्यात जेथे, जेथे कोरोना बाधीताचा मृत्यू झाला तेथे, तेथे स्वता जाऊन मयत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची वाट न पहाता कोणत्याही प्रकारची आशा न बाळगता फक्त आणि फक्त समाजसेवा म्हणून कोरोना बाधीताचे शव (डेथ बॉडी) कोरोनाची लागण पसरुनये म्हणून नियमांचे पालन करत पॅकिंग करून स्वतः स्मशान भूमीत नेऊन अंतिम संस्कार करण्याचे काम केले.
या त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात कोरोना काळात यमदूतालाही परतवून लावत अनेकांना जीवदान देणारे डॉक्टर मा.श्री. भुषण दादा मगर, मा.श्री. स्वप्नील दादा पाटील यांच्या हस्ते मा.श्री. अतिषजी चांगरे व चिरंजीव सुरज भैरु चांगरे यांना हजारोंच्या उपस्थितीत शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ ध सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
अतिषजी चांगरे व सुरज भैरु यांच्या या कार्याचे तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरात कौतुक होत आहे.