पोलिस हेड कॉन्स्टेबल मा.श्री. बळीराम सपकाळे यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न.

सुमित पाटील.(वावडदा)
दिनांक~३१/१२/२०२१
३१ डिसेंबर २०२१ या वर्षाला निरोप देत असतांनाच आज जळगाव एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या म्हसावद दूरक्षेत्र येथे कार्यरत असलेले पोलिस हेड कॉन्स्टेबल मा.श्री. बळीराम सपकाळे हे ३८ वर्षे यांनी पोलिस विभागात सेवा बजावल्यानंतर आज तेही सेवानिवृत्त होत असल्याने एम.आय.डी.सी.पोलिसांनी बळीराम सपकाळे यांनीही सेवानिवृत्ती निमीत्ताने सत्कार सोहळा साजरा करण्यात आला.
या सेवानिवृत्ती व निरोप समारंभाचेवेळी पोलिस निरीक्षक दादासाहेब प्रताप सिकारे साहेब, पोलिस उपनिरीक्षक अमोल मोरे साहेब, पोलिस उपनिरीक्षक गिरासे साहेब, पोलिस उपनिरीक्षक जगदाळे साहेब, पोलिस कॉन्स्टेबल अतुल वजारी. आनंदसिग पाटील. रतिलाल पवार. राजेंद्र उगले. सोपनिल पाटील. हेमंत पाटील प्रदीप पाटील. नाना बागुल. आंबा महाजन या सह सर्व स्नेही बांधव उपस्थित होते.