पेटलोच तर जाळ होईल, गरीबाच्या चुलीतला,मात्र कुणाचे घर पेटवणार नाही.
दिनांक~३१/०७/२०२२
पेटलोच तर जाळ होईल, गरीबाच्या चुलीतला,मात्र कुणाचे घर पेटवणार नाही.
———————————–
आज आदरणीय रमेशजी बाफना सर (कोल्हे )यांचा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने सरांना आभाळ भरून शुभेच्छा.
एका छोट्याशा गावामध्ये राहून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावाचं नाव घेऊन जाणारा अवलिया माणूस बाफनाजींचा जन्म १९५४ साली गरीब शेतकरी कुटुंबात झाला, घरची परिस्थिती जेमतेम भाकरीचाच प्रश्न होता. तर शिक्षणाची गोष्ट दूरच होती मात्र शिक्षणाचे मनामध्ये प्रचंड ओढ आणि आस असल्याने सरांनी अकोला येथील शिवाजी विद्यालयात मामांच्या घरी राहून शिक्षण घेतलं. एम कॉम सीए इंटर पर्यंत शिक्षण झाल्यावर पोटापाण्याचा मार्ग शोधावा म्हणून सुप्रीम पाईप जळगावला १९८६ साली नोकरी सुरू केली. मात्र शेती शेती निष्ठाता, शेतीचे प्रश्न, शेतकऱ्यांची व्याकुळता, पाचवीला पुजलेला दुष्काळ, या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच नोकरीत मन लागलं नाही.
म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन पुन्हा आपल्या कोल्हे गावी येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. काळ्या आईवर निसिम प्रेम करणारा हा माणूस स्वतः मेहनत करून शेती करू लागला. त्या काळात बापूसाहेब के. एम. पाटलांनी कोल्हे व कोल्हे परिसरासाठी वरदान ठरलेल कोल्हे धरण बांधल. गावात चौफेर पाणी खेळू लागलं त्या पाण्याचा व शेतीचा पुरेपूर फायदा करून घेत बाफना सरांनी शेतीमध्ये नव नवीन प्रयोग केले, रोपवाटिका, गांडूळ खत प्रकल्प, देशी गाई पालन, सेंद्रिय शेती, फळझाड, असे अनेक प्रयोग करून शेती फायद्यात कशी आणता येईल याचा सतत विचार केला, एक उच्चशिक्षित तरुण शेती करू शकतो तेही चांगल्या प्रकारे हे समाजाला दाखवून दिलं
बाफना सरांनी समाज हितासाठी राजकारणामध्ये भाग घेतला ते पाचोरा तालुक्यामध्ये जुन्या शिवसैनिकांचे यादीमध्ये त्यांचं नाव मानाने घेतलं जातं, गावातील व तालुक्याचं राजकारण अतिशय प्रामाणिकपणे केल त्या गोष्टीचा विचार करून पक्षश्रेष्ठींनी १९९६ ला (MCAER) राहुरी कृषी विद्यापीठावर निवड केली. त्या काळामध्ये त्यांनी अनेक प्रयोग व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम केले. आपल्या छोट्याशा कोल्हे गावांमध्ये शेतीसाठीचे प्रयोगशाळा निर्माण केली २००० साली परिसरातील शेतकऱ्यांच्या गोरगरिबाच्या पोरांना कृषी पदविकेचे शिक्षण घेता यावं म्हणून कृषी विद्यालय आणलं या विद्यालयामुळे कितीतरी गोरगरिबांच्या पोरांना कृषी प्रशिक्षण मिळालं काहींना नोकरी, काहींचा चांगला व्यवसाय, काहींची चांगली शेती व ज्ञान मिळाल्यामुळे परिसराचा विकास झाला.
महाराष्ट्रातील नामांकित वक्ते शेती तज्ञ त्या ठिकाणी बोलावले या वक्त्यांमध्ये भारतातील नव्हे तर बाहेरील ही विद्वानांनी हजेरी लावली यामध्ये अरविंद सावंत, कुलगुरू एस. एस. मगर, डॉक्टर सुभाष पुरी, डॉक्टर अरविंद देशमुख, के बी पाटील, गुलाबराव पाटील, आर. ओ. तात्या पाटील, कवि महानोर, विश्वासराव शेळके, मनीष दादा जैन, बाबूजी, कृषी जिल्हाधिषक नागरे साहेब व सर्वात महत्त्वाचे म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे दोन खासदार व अमेरिकेचा स्टडी ग्रुप या छोट्याशा कोल्हे गावांमध्ये येऊन गेला, आणि परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून गेला.
बाफना सर राहुरी कृषी विद्यापीठात सदस्य असताना त्यांनी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले अनेक बी बियाण्यांच्या बाबतीत रसानांच्या बाबतीत तक्रारी केल्या २००४ साली शरद पवार साहेबांना भेटून शेततळ्याच्या ताडपत्रीच्या अनुदानासाठी विशेष प्रयत्न करून शेतकऱ्यांना अनुदान मिळवून दिले, असे अनेक शेतकऱ्यांसाठी काम करत असतांना तालुक्याच्या जिल्ह्याच्या अनेक कमिट्यांवर त्यांना समाविष्ट करण्यात आले, मात्र ते तत्त्वनिष्ठ असल्यानं या गोष्टी त्यांना आवडत नाहीत त्याचा ते सतत त्याग करत असतात (MCAER) वर त्याची परत निवड झाली होती. मात्र सरकार बदलल्यामुळे त्यांनी एवढे मोठे पद नाकारून राजीनामा दिला होता, तसेच आता पाचोरा तालुका आत्मा कमिटी ( कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन समिती)चा राजीनामा दिला आहे अशा या आदर्श व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या पुनश्च शुभेच्छा
प्रार्थयामहे भव शतायु: ईश्वर: सदा त्वाम् च रक्षतु।
पुण्य कर्मणा कीर्तिमार्जय जीवनम् तव भवतु सार्थकम्।।
संतोष पाटील
7666447112