जिल्हाधिकारी मा. श्री. अमन मित्तल २८ जून रोजी पाचोरा शहरात.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०६/२०२३
जिल्हाधिकारी मा. श्री. अमन मित्तल साहेब हे २८ जुन २०२३ बुधवार रोजी पाचोरा दौऱ्यावर येत असून उपविभागीय अधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी यांची बैठक, दुपारी १२:३० वाजता नागरिकांच्या भेटी, त्यांच्या समस्यांबाबत निवेदन स्वीकारणे व त्या संदर्भात चर्चा करणे, दुपारी १:३० वाजता तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडिया प्रतिनिधींची प्रशासकीय विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. याप्रसंगी तालुक्यातील नागरिकांनी, इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडिया प्रसार माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी मा. श्री. अमन मित्तल यांच्या आदेशानुसार पाचोरा तहसिलदार प्रविण चव्हाणके यांनी केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.