पाचोरा तालुका जगा आणि जगू द्या विकास मंचच्या बेमुदत धरणे आंदोलनाचा सहावा दिवस, एक फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाचा इशारा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०१/२०२३
शासनदरबारी शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, बेघर तसेच विधवा परित्यक्ता महिलांना शासनाने देऊ केलेल्या सवलती, सोयी, सुविधा, मानधन व इतर सुविधा मिळत नाहीत तसेच त्या सुविधा मिळवून घेण्यासाठी किंवा रेशनकार्ड मिळवण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात हा गैरप्रकार रोखण्यासाठी जगा आणि जगू द्या विकास मंचचे अध्यक्ष मा. श्री. निळकंठ प्रल्हाद पाटील, उपाध्यक्ष मा. श्री. गुलाबराव प्रताप पाटील व सचिव मा. श्री. भुषण कृष्णा वानखेडे यांनी दिनांक २५ जानेवारी २०२३ पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.
धरणे आंदोलन सुरु होऊन आज सहावा दिवस उजाडला तरीही पाचोरा तालुक्यातील जबाबदार अधिकारी, लोकप्रतिनिधी याकडे मुद्दामहून डोळेझाक करत असल्याचे बोलले जात आहे.