कुंडलपुर येथील राज्यस्तरीय पंचकल्याणक प्राणप्रतिष्ठा महोत्सवात खान्देशातील जैन समाजाचा एक हजार भाविकांचा सहभाग.
गौरव जैन.(कुसुंबा)
दिनांक~०९/०२/२०२२
राज्यस्तरीय अतिशय क्षेत्र कुंडलपुर येथे १२ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा पंचकल्याणक महोत्सवात देशातून हजारो जैन समाज बांधवांची उपस्थिती बरोबर खान्देशातूनही हजारो जैन श्रावक यांची उपस्थिती लाभणार असल्याची भाविकांत चर्चा दिसून आल्याची माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धीप्रमुख व खान्देश जैन पत्रकार व कुसुंबा अतिशय क्षेत्राचे विश्वस्त सतीश वसंतीलाल जैन कुसुंबा यांनी दिली. विशेष म्हणजे साऱ्या विश्वाचे लक्ष वेधून घेणारे विशाल संघाचे गणनायक राष्ट्रसंत विश्ववंद्य दिगंबराचार्य श्रमण संस्कृतीचे आद्य कीर्तिवान आचार्य विद्यासागर जी महामुनी यांच्या उपस्थितीत दिनांक १२ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी पर्यंत पंचकल्याणक प्राणप्रतिष्ठा महोत्सव संपन्न होत आहे.
त्यासाठी त्यांचे परमशिष्य मुनीश्री, आर्यिका माताजी क्षुल्लक व ऐल्लक ब्रह्मचारी भैय्या, दीदी असे ५०० त्यागी तपस्वी यांचे आगमन झाले असून येणाऱ्या हजारो भाविकांसाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्था क्षेत्राने केली असून या महोत्सवात प्रतिदिन आचार्यश्रीचे प्रवचन व धार्मिक परंपरेनुसार विविध धार्मिक कार्यक्रमांनी ऐतिहासिक असा पंचकल्याणक प्राण प्रतिष्ठा व गजरथ महोत्सव संपन्न होणार आहे.