कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांडवे दिगर,ता.भुसावळ येथील मोतीमाता यात्रोत्सव रद्द.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०१/२०२१
जामनेर तालुक्यातील गारखेडा येथून जवळच असलेल्या मांडवे दिगर,ता.भुसावळ येथील प्रसिद्ध व नवसाला पावणारी मोतीमाता देवीचा यात्रोत्सव दरवर्षाप्रमाणे पौष पौर्णिमेला यावर्षी देखील दि.२८ आणि २९’जानेवारी रोजी साजरा होणार होता.परंतु,कोरोना या जागतिक महामारीमुळे जगभरात कित्येक बांधव मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि अजुनही गेल्या ११ महिन्यापासून या आजाराचा समूळ नायनाट होत नसल्याने या आजाराला आळा बसावा म्हणून केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन जाहिर केलेला आहे.त्यामुळे राज्य शासनाच्या नियमानुसार आणि जळगाव जिल्हाधिकारी-मा.अभिजीत राऊतसाहेब,भुसावळ उप विभागीय अधिकारी-मा.सोमनाथ वाकचौरे साहेब,यांच्या आदेशाने या गावातील प्रसिद्ध आणि नवसाला पावणारी अशी मोतीमाता देवीचा यात्रोत्सव यावर्षी सर्व गावकरी यांनी एकमुखी निर्णय व विचार विनीमय करुन रद्द करण्यात आला आहे.परंतु, सर्व भाविकाना मोतीमाता देवीचे दर्शन घेता यावे यासाठी मंदिर दि.२८ आणि २९ जाने.२०२१ रोजी संपूर्ण दिवसभर खुले राहील.
तरी,परिसरातील सर्व ग्रामस्थ व विविध प्रकारच्या दुकानदार,व्यावसायिक यांनी आपली कुठल्याही प्रकारची दुकाने आणू नयेत असे आवाहन भुसावळ तालुका पोलिस निरीक्षक-मा.रामकृष्ण कुंभारसाहेब,पोलिस उपनिरीक्षक-मा.अमोल पवारसाहेब,कुर्हे पानाचे औट पोस्ट चे मा.युनूस शेखसाहेब,पोलिस पाटील-मा.रविंद्र पवार, मोतीमाता मंदिर ट्रस्ट,मांडवेदिगर,ता.भुसावळ चे अध्यक्ष-मा.सरीचंद पवार आणि सर्व संचालक मंडळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी भाविक भक्तांनी
सरीचंद रघुनाथ पवार (अध्यक्ष)
मोतीमाता मंदिर ट्रस्ट
मांडवेदिगर,ता.भुसावळ.
संपर्क-९६८९३६३२६१.
यांच्याशी संपर्क साधावा