पाचोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात हिरव्यागार वृक्षांची कत्तल, पाचोरा वनविभाग बेदखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/१२/२०२१
आज सकाळी दिवसाढवळ्या पिंपळगाव हरेश्वर येथील गॅस कंपनी जवळ एका शेतकऱ्याच्या बांधावरील हिरव्यागार दहा निंबाच्या हिरव्यागार वृक्षांची कत्तल करण्यात आल्याने सूज्ञ नागरिकांनी सत्यजीत न्यूजकडे कैफियत मांडून कायमस्वरूपी वृक्षतोड थांबावी यासाठी आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
या बाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यात सर्वदूर मोठ्या प्रमाणात हिरव्यागार वृक्षांची कत्तल सुरू आहे. हि वृक्षतोड सातगाव डोंगरी, शिंदाड, पिंपळगाव हरेश्वर, भोजे, चिंचपुरे, सावखेडा तसेच कुराड, लोहारा व इतर गाव परिसरातील शेतांमध्ये तसेच सार्वजनिक हद्दीतील हिरव्यागार वृक्षांची दिवसाढवळ्या कत्तल केली जात आहे.
याबाबत वारंवार आवाज उठवून सुद्धा पाचोरा वनविभाग वृक्षतोडीकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी वृक्षतोड थांबवत नसल्याने निसर्गप्रेमी संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. तसेच पाचोरा विभागाचे जबाबदार वन अधिकारी यांच्या ७५१८५५७८१३ भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केल्यास ते फोन घेत नसल्याने अजूनच संशय बळावत आहे. अशीच वृक्षतोड सुरू राहिल्यास निसर्गप्रेमी लवकरच आंदोलन करणार असल्याचे निसर्गप्रेमींनी बोलून दाखवले पाचोरा.