पाचोरा तहसीलदार मा.श्री. कैलासजी चावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/१२/२०२१
पाचोरा तालुक्याचे तहसीलदार मा.श्री. कैलासजी चावडे साहेब यांचा आज वाढदिवस असल्याने पाचोरा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने तसेच सेतू कक्षाचे संचालक, स्टॅम्प वेंडर, रेशनिंग दुकानदार, सामाजिक संघटना यांनी वाढदिवसाच्या प्रत्यक्ष शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती. तसेच बऱ्याचशा स्नेही मंडळीने भ्रमणध्वनीवर शुभेच्छा दिल्या.
परंतु मा.श्री. तहसीलदार साहेब यांनी कार्यालयीन कामकाज नियमितपणे करत आपल्या चाहत्यांच्या शुभेच्छा स्विकारल्या यात कुऱ्हाड गावचे माजी सरपंच श्री. रामदास देशमुख, पंचायत समितीचे माजी सभापती श्री.अनिल पाटील, रेशनिंगचे कोषाध्यक्ष श्री.नितीन भाऊ राठी, माळी समाजाचे अध्यक्ष श्री.संजय महाजन माळी, भारतीय जनता पक्षाचे कुऱ्हाड, लोहारा गटाचे गणप्रमुख श्री.जगदीश भाऊ तेली, पोलिस मा. श्री. राहुल बेहरे, श्री.अरुण न्याती, श्री.राजू राठोड (कुऱ्हाड तांडा), ऋषिकेश पाटील (सांगवी) इत्यादी स्नेही जनांनी शुभेच्छा दिल्या.