मा.आमदार श्री. किशोरआप्पा पाटील. यांच्या उपस्थितीत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/११/२०२०
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव ते डांभुर्णी रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासन जिल्हापरीषद बांधकाम विभाग जळगाव यांच्या माध्यमातून जिल्हापरिषद सदस्य सौ.रेखाताई दिपकसिंग राजपूत.निधीतून अठ्ठेचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
या कामाचा शुभारंभ करण्यासाठी दिनांक २९ नोव्हेंबर रविवारी मा.आमदार श्री. किशोरआप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे मा.श्री. अरुण पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून माजी जिल्हापरिषद सदस्य दिपकसिंग राजपूत यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला.
या प्रसंगी श्री. उत्तमभाऊ राठोड, हेमराज राठोड, चरणसिंग राठोड, धनराज राठोड, उदल चव्हाण, शाम राठोड, विनोद राठोड, दत्तू राठोड, विपुल राठोड, कुलदीप जाधव, राजु राठोड, समाधान पवार, शिवदास जाधव, बसराज पवार, गोकुळ चव्हाण, रंगलाल चव्हाण, दिनकर चव्हाण, धर्मराज दल्लू व असंख्य ग्रामस्थ हजार होते.
कार्यक्रमाचे सुरवातीला सेनिटायझर व मास्क देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.