पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रतापराव इंगळे यांनी पदभार सोडला तर मा. श्री. सचिन सानप यांनी पदभार स्वीकारला.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०६/२०२३
जामनेर तालुक्यातील पहुर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक मा. श्री. प्रतापराव इंगळे यांची जालना येथे बदली झाली असून काल रात्री त्यांनी पदभार सोडला तर त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन सानप यांनी नुकताच पदभार करण्यात आली असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे.
कर्तव्यदक्ष निरीक्षक मा. श्री. सचिन सानप यांची २००६ मध्ये पोलिस दलात सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून निवड झाल्यानंतर अहमदनगर शहर, श्रीगोंदा, सोनई तसेच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, पारोळा, वरणगाव येथे सेवा बजावली आहे.
पोलिस निरीक्षक म्हणून बढती मिळाल्यानंतर छत्रपती संभाजी नगर येथील बेगमपूरा, वेंदातनगर आदी पोलिस ठाण्यात सेवा बजावली असून आता नुकताच त्यांनी जळगाव जिल्ह्यात पहुर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.