सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›डांभुर्णी येथे दगडफेकीत एका महिलेसह चार जखमी,प्रभारी सरपंचासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

डांभुर्णी येथे दगडफेकीत एका महिलेसह चार जखमी,प्रभारी सरपंचासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

By Satyajeet News
December 6, 2021
900
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/१२/२०२१

पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी येथे घर बांधकामाच्या कारणाहून दोन गटात दगडफेक झाल्याने यात एका महिलेसह चार जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

घटनेप्रकरणी प्रभारी सरपंचासह सहा जणांवर हाणामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमींचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर कलमांमध्ये वाढ होऊन ३०७ कलमानुसार गुन्हा दाखल होण्याची माहिती पिंपळगाव हरेश्वर पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. सदर घटना रविवार, दि.०५ रोजी सकाळी ९:३० वाजेच्या दरम्यान घडली असून घटनेविषयी पिंपळगाव (हरे.) पोलिसात सोमवारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राकेश खोंडे हे करीत आहेत.

डांभुर्णी ता. पाचोरा येथील पदमसिंग रामसिंग परदेशी यांचे नवीन घराचे बांधकामासाठी रविवारी सकाळी ९:३० च्या दरम्यान चिंचपुरे येथील कारागीर आले होते. दरम्यान येथील प्रभारी सरपंच संतोष नवलसिंग परदेशी, अजय ईश्वर परदेशी, उज्वला संतोष परदेशी, अलका ईश्वर परदेशी, ईश्वर विठ्ठल परदेशी, नवल शामसिंग परदेशी यांनी सदर घराचे बांधकाम हे अतिक्रमण भागात असून ते तुम्ही करू नका असे सांगितले.

ते असे सांगत असतांना घरमालकाचा २० वर्षाचा शाळकरी मुलगा निलेश पदमसिंग परदेशी हा आम्ही आमच्या जागेतच बांधकाम करीत आहोत तुम्ही कारागिरांना असे का बोलता ? असे सांगण्यासाठी गेला असता संतोष नवलसिंग परदेशीसह इतर पाच जणांनी त्यास शिवीगाळ करून हातातील दगड उजव्या डोळ्यावर मारून फेकला. त्यामुळे त्याच्या डोळ्याला गंभीर मार लागला. याशिवाय संशयित आरोपींनी हातात दगड घेऊन अलकाबाई पदमसिंग परदेशी, छोटुराम रामचंद्र परदेशी यांना मारहाण करीत असतांना भांडण सोडविण्यासाठी निलेश परदेशी यांचा चुलत काका जीवन बाबूसिंग परदेशी यांच्याहीडोक्यावर दगड मारल्याने डोक्याला सात टाके पडले आहेत.

छोटुराम परदेशी व अलकाबाई परदेशी यांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांनी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार केले. घटनेप्रकरणी दि. ६ रोजी सोमवारी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलीस ठाण्यात निलेश पदमसिंग परदेशी यांनी अजय ईश्वर परदेशी, उज्वला संतोष परदेशी, अलका ईश्वर परदेशी , ईश्वर विठ्ठल परदेशी, संतोष नवल परदेशी व नवल शमसिंग परदेशी यांच्या विरुद्ध हाणामारीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र जखमींची वैद्यकिय अहवाल आल्यानंतर गुन्ह्याच्या कलमात वाढ होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 56
Previous Article

भाजपाचे अमोल शिंदे यांच्या पत्राची निवडणुक आयोगाने ...

Next Article

वरखेडी येथे घरफोडी, सुनील पांडे यांच्या घरावर ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    अज्ञात व्यक्तीने दिड एकर क्षेत्रातील कपाशी पिकावर तन नाशक फवारणी केल्याने शेतकऱ्याचे दिड लाख रुपये नुकसान.

    September 1, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    कुऱ्हाड बुद्रुक येथील ग्रामपंचायतीचा पंटर अँटी करप्शन च्या जाळ्यात संशयाची सुई ग्रामसेवकाकडे.

    March 19, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्र्वर गावात हप्ते वाढल्यामुळे गुटखा महागला गुटखा विक्रेत्यांचा जाहीर खुलासा.

    November 9, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोर शासन व्हावे. अन्यथा जेलभरो आंदोलन पिडीत मुलीच्या समाजबांधवाचा इशारा.

    April 25, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    कुऱ्हाड येथील अवैधधंदे करणारे एक पाऊल पुढे, भ्रमणध्वनीवर घेतले जातात मटक्याचे आकडे.

    October 13, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पंढरपूर येथील अट्टल गुन्हेगाराला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक.

    September 23, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    विश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची निवड.

  • महाराष्ट्र

    पुढाऱ्यांनो नुसतेच शेतकर्‍याच्या दारावर फिरण्याचे काम करू नका.

  • शैक्षणिक

    एस. एस. एम. एम. महाविद्यालय येथे नेहरू युवा केंद्र जळगावं व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने गहन स्वयंसेवक नोंदणी कार्यक्रम(IVEP) आणि CLEAN INDIA 2.0 अभियान कार्यक्रमाचे आयोजन.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज