भोकरी (वरखेडी) गावात चोरट्यांनी सलामी देत बुलेट मोटारसायकल लांबवली.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/११/२०२३

पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथुन जवळच असलेल्या भोकरी येथील डॉ. अश्फाक शफी कहाकर यांच्या मालकीची एम. एच. १९, ई. सी. ९१४३ या क्रमांकाची बुलेट कंपनीची मोटारसायकल भोकरी येथील रेल्वे फाटकाजवळ असलेल्या त्यांच्या रहात्या घरासमोरुन रात्री ११ वाजेपासून तर सकाळी पाच वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना आज सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की काल दिनांक १८ नोव्हेंबर २०२३ शनिवार रोजी डॉ. अश्फाक शफी कहाकर हे कामानिमित्त पाचोरा येथे गेले होते. तेथुन सायंकाळी परत आल्यानंतर शेताकडे फेरफटका मारुन संध्याकाळी सात वाजेपासून त्यांनी त्यांच्या मालकीची बुलेट कंपनीची मोटारसायकल भोकरी येथील राहत्या घरासमोर उभी करुन रात्री झोपी गेले. परंतु आज सकाळी दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ रविवार रोजी सकाळी नियमितपणे नमाज अदा करण्यासाठी पाच वाजता उठून घराबाहेर येऊन पाहिले असता बुलेट मोटारसायकल जागेवर दिसून आली नाही.

म्हणून त्यांनी घराच्या आसपास पाहिले तसेच घरातील इतर सदस्यांना विचारपूस केली मात्र या तपासातून बुलेट मोटारसायकल घरासमोर उभी केल्यानंतर कोणीही तीचा वापर केला नाही किंवा इतरत्र घेऊन गेले नसल्याचे उघड झाल्यानंतर आपल्या मालकीची गाडी चोरी गेल्याची खात्री झाली आहे. याबाबत डॉ. अश्फाक शफी कहाकर हे लवकरच पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार असून वरील वर्णनाची बुलेट मोटारसायकल कुणालाही आढळून आल्यास ९९२१६४७१४३ या भ्रमणध्वनीवर क्रमांकावर किंवा पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन ०२५९६/२७८२५५ संपर्क साधावा असे आवाहन डॉ. अश्फाक कहाकर यांनी केले आहे.

ब्रेकिंग बातम्या