सावखेडा येथील गोळी लागून निधन झालेल्या जवानाचे निवासस्थानी खासदार उन्मेश दादा पाटील व मधुकर भाऊ काटे यांची सात्वनपर भेट.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/११/२०२१
पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील गोळी लागून निधन झालेल्या जवानाचे निवासस्थानी खासदार उन्मेश दादा पाटील व जिल्हापरिषद सदस्य मा.श्री. मधुकर भाऊ काटे यांनी आज सायंकाळी भेट देऊन परदेशी कुटुंबीयांचे सात्वन केले.
सावखेडा येथील स्व.मंगलसींग जयसिंग परदेशी हा जवान आपले कर्तव्य बजावत असतांना पठाणकोट येथे गोळी लागून त्या घटनेत त्यांचे निधन झाल्याची घटना काल सकाळी घडली होती. या घटनेमुळे पाचोरा तालुक्यावर शोककळा पसरली होती. या घटनेची माहिती मिळताच खासदार मा.श्री. उन्मेष दादा पाटील व जिल्हापरिषद सदस तथा भाजपा सरचिटणीस मधुकर भाऊ काटे यांनी सावखेडा येथे येऊन स्व.मंगलसींग यांच्या परिवाराची सात्वनपर भेट घेतली. त्यांच्या कुटुंबीयांचे सात्वन करून धीर दिला.
यावेळी सरपंच समाधान वाघ, देवीलाल परदेशी माजी सैनिक, गणेश राजपूत, सुनिल तडवी, अशोक तडवी, मोतीलाल राजपूत आदी मान्यवर कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.