सावखेडा येथील मंगलसींग परदेशी यांच्यावर मंगळवारी सकाळी शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/११/२०२१
पाचोरा तालुक्यातील सावखेडा गावचे सुपुत्र, ७३४ TPT WKSP मध्ये कार्यरत जवान नायक मंगलसिंग जयसिंग परदेशी यांचे आज दिनांक १४ नोव्हेंबर, २०२१ रविवार रोजी पहाटे १.४० वाजता पठाणकोट येथे बंदुकीची गोळी लागल्यामुळे निधन झाले आहे.
त्यांचे पार्थिव सोमवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ सोमवार रोजी पठाणकोट येथून विमानाने दुपारी ४.०० वाजता मुंबई येथे येईल. तेथुन ॲम्बुलसने त्यांचे मुळगाव सावखेडा, तालुका पाचोरा येथे मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१ मंगळवार रोजी सकाळी ६ वाजे दरम्यान पोहचेल.
त्यानंतर त्यांचेवर सकाळी ९:३० वाजता सावखेडा येथे मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येईल. अशी माहिती जळगाव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे वेल्फेअर अधिकारी अनुरथ वाकडे यांनी दूरध्वनीवरून दिली आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.