श्री.स.भु प्रशाला गोंदेगाव येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०३/२०२२
आज जागतिक महिला दिनानिमित्त गोंदेगाव येथील श्री.स.भु प्रशाला येथे सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ ताई सौ. डॉ. ग्रीष्मा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सुरवातीला कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. सौ. ग्रीष्मा पाटील यांच्या हस्ते व शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. मा.श्री.योगेश दादा इंगळे, शालेय समितीचे सदस्य मा.श्री. सदाशिव महालपूरे, गोंदेगावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. वनमालाताई निकम, सौ.मोनालीताई इंगळे, ग्रामपंचायत सदस्या सौ.रेखाताई पवार यांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले.
नंतर प्रशालेच्या वतीने उपस्थित परिचारिका आव्हाळे ताई व सर्व मान्यवर महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी महिमा सोनवणे, वाघ चैताली, निकिता घुले, सिद्धी नेरपगार, आर्या पाटील, प्रांजली महाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. सौ. ग्रीष्मा पाटील यांनी त्यांच्या शैक्षणिक जिवनातील अनुभव कथन केले तसेच जिद्द, चिकाटी व ध्येय डोळ्यासमोर ठेऊन आभ्यास केला तर नक्कीच यश संपादन करता येते प्रत्येक स्री जिवनात एकाचवेळी कन्या, बहिण, सुन, पत्नी, आई अश्या अनेक भुमिका निभावत असतांनाच नव्या पिढीला संस्कार देण्याची जबाबदारी पार पाडत असते म्हणून मुलींनी चांगले शिक्षण घेऊन व उत्तम आरोग्य राखले पाहिजे कारण शिक्षीत आई, घराला पुढे नेई हे ब्रीद आहे. असे सांगत मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे असे आवाहन केले. आदरणीय डॉ. योगेश दादा इंगळे तसेच सरपंच वनमालाताई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संयोजन श्रीमती वैशाली पाटील, श्रीमती वर्षा दाबके यांनी तर सुत्रसंचालन श्रीमती अनिता वाघ यांनी व आभारप्रदर्शन श्रीमती आशा पाटील यांनी केले. मुख्याध्यापक मा. श्री. चित्तोडकर सर, उपमुख्याध्यापक आदरणीय श्री. माळी सर सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदरणीय श्री. चित्तोडकर सरांनी केले.