कोल्हे गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी. (रमेशजी बाफणा)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०१/२०२१
🌴शिवसेना पक्षाच्या माध्यमातून रमेश बाफना, स्वर्गीय सुभाष माळी, भास्कर महाराज, व शामद तडवी यांनी आजी-माजी ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून केलेली विकास कामे🌴
(उघडा डोळे बघा नीट ग्रामस्थ) १) बंधूंनो आपल्या कोल्हे गावांमध्ये शिवसेना स्थापन करण्यासाठी स्व. पुंडलिक धोंडू पाटील, तुळसाबाई गोबजी पाटील. यांनी केलेल्या केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. यांच्यासोबत श्री. राजाराम पांडुरंग माळी , हरी मोतीराम वाघ, शिवाजी धोंडू पाटील, रामचंद्र पाटील, तोताराम गोविंदा पाटील यांना मानाचा मुजरा……………….
२) सन १९९२-९३ मध्ये गावाचे पुनर्वसनासाठी त्यावेळचे विरोधी पक्षनेते ते विधान परिषदेचे सुधीरभाऊ जोशी.व अरविंद सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. ३) पुनर्वसन अशक्य असल्यामुळे अतिवृष्टीमुळे पडलेल्या घरांऐवजी ४७ घरकुलांना मंजुरी मिळवून ती स्व. सुभाष दगडू माळी व इतर ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून पूर्ण करून घेतली.
४) कोल्हे ते आंबेवडगाव व कोल्हे ते पिंपळगाव रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था असताना मंत्रालयातून मंजुरी आणून अगोदर पाच किलोमीटर व नंतर काळात आमदार स्व.आर.ओ.पाटील तात्या यांच्या सहकार्याने पाच किलोमीटर डांबरीकरण पूर्ण करून घेतले. ५) दोन वर्षांपूर्वी आमदार श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री सडक योजना अंतर्गत कोल्हे ते अटल गव्हाण साडेतीन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण केले. ६) त्याचवेळी प्रशासनाची भांडून -शिवाजी धोंडू पाटील. यांच्या शेतापासून-बाबुराव तुकाराम पाटील यांच्या शेतापर्यंत भक्कम अशी गटार बांधून आवश्यक त्या ठिकाणी ते ढापे बांधून घेतले. ७) जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी स्व.आर.ओ. तात्यांच्या मदतीने व तोताराम गोविंदा पाटील,गफूर शेनफडू तडवी ,शिवाजी धोंडू पाटील. स्वर्गीय सुभाष दगडू माळी. बाबुराव आत्माराम पाटील. किशोर रूपचंद बाफना . सलीम दगडू तडवी व सोसायटीच्या इतर सदस्यांच्या सहकार्याने सुंदरशी गाव चावडी बांधून घेतली. ८) मध्यंतरी गारपीट झाल्यावर स्व.आर.ओ. तात्या व तहसीलदार साहेब, कृषी अधिकारी यांना सोबत आणून पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली. ९) विद्युत पुरवठा संदर्भात वेळोवेळी अडचण येत असल्यामुळे ठिय्या आंदोलन करून ग्रामपंचायत सदस्य, महिला ग्रामस्थ, श्री.उद्धव मराठे व आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सहकार्याने ने पिं पिप्री धरणामध्ये १०० हॉर्स पॉवर डीपी बसून घेतली. त्याप्रमाणे शिवाजी धोंडू पाटील यांनी यांच्या शेताजवळ शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र डीपी बसवून घेतली. १०) जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून स्व.आर.ओ. तात्यासाहेब व प्रांत गणेश मिसाळ साहेब व संबंधित अधिकाऱ्यांना एकत्र आणून प्रत्येकी बारा लाख रुपये किमतीचे तीन बंधारे मागुन घेतले. ११) पाणलोट योजनेच्या माध्यमातून- पाणी आडवा, पाणी जिरवा -योजनेअंतर्गत नाला खोलीकरण करून घेतले. १२) सुसज्ज असे प्राथमिक आरोग्य केंद्र जवळपास एक कोटी रुपये खर्चाचे काम प्रगती पथावर असून यासाठी सुरुवातीला जि.प.सदस्य श्री उद्धव मराठे ,माजी सरपंच सौ. प्रतिभा संतोष पाटील ,ग्रामसेवक एल.एन.पाटील व नंतरच्या काळात जि.प.सदस्य श्री.मधु भाऊ काटे यांचे विशेष सहकार्य लाभले. १३) शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून व जि.प. सदस्य मधुभाऊ काटे यांच्या प्रयत्नातून नवीन शाळा इमारतीची उभारणी व उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यावेळचे मुख्याध्यापक श्री जयवंत पाटील व इतर सर्व गुरुजींचे मनःपूर्वक अभिनंदन. १४) ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून पाचोरा तालुक्यात सर्वात जास्त निधी जिल्हा परिषद शाळेला देऊन उत्कृष्ट प्रतीचे झाडांना संरक्षक ओटे व पेवर ब्लॉक, वॉटर फिल्टर ,खेळाचे साहित्य व शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न केले. १५) एम.आर.इ.जी.एस योजनेमधून मोराड रस्त्यापर्यंत खडीचा रस्ता करून घेतला. १६) गावातील अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण जि.प.सदस्य श्री. मधुभाऊ काटे- ३ लाख, आमदार किशोर आप्पा पाटील- ६ लाख ,दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत -६ लाख ,भूमिगत गटार व ओपन गटार इत्यादी कामे केली. १७) माननीय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या आमदार फंडातून तडवी भिल्ल स्मशानभूमीसाठी पाच लाख रुपयाचे संरक्षक भिंत बांधून घेतली. १८) गावात जातीय सलोखा टिकून राहावा म्हणून विशेष प्रयत्न केले, हिंदू-मुस्लीम वाद टाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. १९) वैयक्तिक लाभ मिळवून देण्यासाठी स्व.रतन दगडू गोपाळ यांच्या रेल्वे अपघातानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आठ लाखाची भरीव मदत रेल्वेकडून मिळवून दिली. स्वर्गीय चाँदखा लतीफ तडवी यांच्या पत्नीला गफूर भाऊ तडवी ,भिवसन रामचंद्र पाटील. यांना सोबत घेऊन समजावून पाच लाखाची मदत मिळवून दिली.श्रीमती कलाबाई शंकर गोपाळ यांच्या नातवाला हृदयाच्या ऑपरेशन साठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आमदार किशोर आप्पा यांच्या मदतीने एक लाख रुपयांची मदत मिळवून दिली.संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेच्या माध्यमातून संतोष भिवसन पाटील,अनिल भाऊराव पाटील, योगेश चांदेकर, शकूर गफुर तडवी, एकनाथ आत्माराम पाटील, नशिबाबाई तडवी ,रवींद्र बाबुराव पाटील ,शांताराम सूर्यवंशी ,अशोक बाबुराव पाटील यांच्या सहकार्याने जवळपास शंभर लोकांना पगार मिळवून दिले.
२०) सतत पंधरा वर्षापासून ग्रामपंचायत निवडणूक निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न करणार.बाफना कुटुंबाला गावाने भरभरून प्रेम दिले म्हणून यावेळी बाफना परिवार वगळून इतरांना संधी देण्याचा प्रयत्न करणार. २१) ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यामुळे स्व.आर.ओ. तात्यांनी ३ लाख रुपयांचे सामाजिक सभागृह व माननीय पालकमंत्री एकनाथ रावजी खडसे साहेबांनी नाविन्यपूर्ण योजना गडीवर पाच लाखांचे सार्वजनिक शौचालय बांधून दिले. यावेळेला ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यास पालक मंत्री आमदार व जिल्हा परिषद सदस्यांकडून अपूर्ण राहिलेले काँक्रिटीकरण यासाठी ३० लाख रुपयांचा निधी आणणारच. २२) मागील वर्षी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना कार्यान्वित झाली आपण त्यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील प्रांताधिकारी राजेंद्र कचरे ,श्री विकास लोहार मेरीको कंपनीचे अधिकारी यांच्याशी सतत संपर्क साधून सुमारे नऊ लाख रुपये मिळून सर्व शेतकऱ्यांना मोफत गाळ भरून दिला. कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी केली नाही. माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आपल्या गावाचं कौतुक केलं. इतरांना सुद्धा आपण गाळ घेऊन जाण्यास प्रवृत्त केल्यामुळे धरण भरल्यावर दोन वर्ष पाणीसाठा पुरेल याचा कुठेतरी ग्रामस्थांनी विचार करावा. 🌴याव्यतिरिक्त वेळोवेळी मी व माझे सर्व सहकारी दोघे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य कोणाचा अपघात असो किंवा इतर आजारांनी दवाखान्यात ऍडमिट असो यांच्याकरिता धावून गेलो.
🌴एवढे सविस्तर लिहिण्याचे कारण काही लोक म्हणतात रमेश बाफना व ग्रामपंचायत सदस्यांनी गावासाठी काहीच केलं नाही. असो ही निवडणूक सुद्धा बिनविरोध पार पाडण्यासाठी प्रयत्न करूया. 🌴आपल्या गावाचा विकास करण्यासाठी योग्य उमेदवारांना संधी देऊया. 🌴आतापर्यत कोल्हे गावाने बाफना कुटुंबाला जो मान-अपमान दिला त्याबद्दल धन्यवाद.
🌷जय हिन्द ,जय महाराष्ट्र 🌷