आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झाले प्रवेशद्वाराचे उद्घाटन आणि रंगमंचाचे भूमिपूजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०१/२०२१
पाचोरा येथील श्री.गो.से.हायस्कूल येथील अनिल दामोदर कासार यांच्या मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वर्गीय सागर अनिल कासार या मुख्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन आणि सेवानिवृत्त शिक्षक अभिमन्यू पाटील यांच्या अमृत महोत्सवानिमित्त रणजीत अभिमन्यु पाटील यांचे सौजन्याने निर्माण होणाऱ्या सौ.जिजाबाई अभिमन्यू पाटील रंगमंचाचे भूमिपूजन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना त्यांनी अनुदानित शासकीय शाळांमधूनच शिक्षणाचे खरे व्यासपीठ उपलब्ध होत असून शाळांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजी आमदार दिलीप वाघ होते तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार अनिल पाटील,मनीष जैन यांचेसह संस्थेचे चेअरमन संजय वाघ,मानद सचिव ॲड महेश देशमुख,व्हा.चेअरमन व्ही.टी.जोशी, शांताराम सोनजी संजय गरुड नितीन तावडे शालिक्रम माळकर भागवत मालपुरे अजहर खान सतीश चौधरी नगरसेवक विकास पाटील संजय पाटील सर्व कार्यकर्ते पाटील तसेच संस्थेचे संचालक व मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या दिवंगत पदाधिकाऱ्यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर अनिल कासार सर तसेच अभिमन्यू पाटील सर यांचा सपत्नीक सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक खलील देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन महेश कौंडिण्य आणि अजय अहिरे यांनी केले. कार्यक्रमला यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुधीर पाटील यांचेसह सर्व पदाधिकारी व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.