पहान ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवार यांची जोरदार मोर्चेबांधणी व आम्हिच निवडून येनार असल्याचा दावा.
संजय पाटील.(पाचोरा)
दिनांक ११/०१/२०२१
पाचोरा तालुक्यात ९६ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या असून येत्या पंधरा जानेवारी शुक्रवारी मतदान होनार आहे.
यात पहान ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार लढत असून दोघेही पॅनलमध्ये मुरब्बी व मार्गदर्शक उमेदवार उभे असल्याने या गाव निवडणूकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
या निवडणुकीत आपापले पॅनल विजयी होण्यासाठी गावात घरोघरी जाऊन ताई, माई, आक्का, तात्या, भाऊ, जिभाऊ व वडीलधाऱ्या मंडळींना भेटून मतदान करण्यासाठी हात जोडले जात आहेत.
यात मग अपक्ष उमेदवार वैशाली प्रकाश महाजन वार्ड क्र, (१) चिन्ह (एसटी बस)
नामदेव काशीनाथ महाजन हे वार्ड क्र,(१) चिन्ह (पुस्तक)
यांनी आपल्या पध्दतीने प्रचार सुरू केला असून जनतेसमोर आपला जाहीरनामा ठेवला आहे.
यात ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक व्हावा म्हणून प्रत्येक तिन महिन्याला ग्रामसभा घेऊन या ग्रामसभेत शासनाकडून आलेला निधी व झालेली कामे जनतेसमोर मांडण्यात येणार असून याच ग्रामसभेत ग्रामस्थांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
तसेच गावात बेघर लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देणे, गावातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचतगट स्थापन करून बचतगटाच्या माध्यमातून लघुउद्योग सुरु करणे.
गावातील आर्थिक दुर्बल घटक व अल्पसंख्याकासाठी शासनाच्या विविध योजना, सोयी, सवलती मिळवून देत त्यांना कौटुंबिक विकासासाठी मदत करणे.
गावातील जेष्ठ नागरिकांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कटीबद्ध असून यात गोर, गरिबांना प्राधान्य देण्यात येणार.
गावातील जिल्हापरिषद शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करुन पटसंख्या वाढवण्यासाठी पालक यांना मार्ग दर्शन करणार येणाऱ्या योजना व विविध कामांचा आढावा तरुण वर्ग साठी विविध भरती मार्ग दर्शन या वरती भर दिला आहे