शासनाच्या योजनेतून कार्यकर्त्याने स्वतः सह परिसर आत्मनिर्भर करण्यासाठी झोकून द्यावे (खासदार उन्मेश दादा पाटील)
[पाचोरा कार्यकर्ता प्रशिक्षण अभ्यास वर्ग* कार्यक्रमात “आत्मनिर्भर भारत” विषयांवर खासदार उन्मेश दादा पाटील यांचे अभ्यासपूर्ण उदबोधन : कार्यकर्ते मंत्रमुग्ध]
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक=२२/११/२०२०
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून तरुण तसेच महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. तसेच कोरोना महामारीच्या कठीण प्रसंगात सर्वसामान्य जनतेला मोफत धान्य, विधवा माता भगिनींना पेन्शन असो शेतकऱ्यांना दिलेली आर्थिक मदत असेल यातून आधार देण्याचे काम केले. तसेच लॉकडाउन काळात अडचणीत आलेल्या सूक्ष्म ,लघु, मध्यम उद्योगांना पॅकेज देवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला. एकीकडे केंद्र सरकारने मोठया योजना राबविल्या असून या योजनांच्या माध्यमातून कार्यकर्त्याने स्वतः सह परिसर आत्मनिर्भर करण्यासाठी झोकून काम करावे. जनतेसोबत कार्यकर्ता आत्मनिर्भर झाला तर त्याचा उत्साह वाढून तो भविष्यात अधिक जोमाने जनतेची सेवा करेल. असे स्पष्ट प्रतिपादन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले. आज पाचोरा येथील शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या सभागृहात आयोजित भाजपा कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमात खासदार उन्मेश दादा पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती सतीश बापू शिंदे तर तालुका सरचिटणीस तथा आयोजक गोविंद शेलार यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व प्रास्ताविक सुनील पाटील यानी तर आभार जयवंत चव्हाण यांनी मानले. यावेळी शहराध्यक्ष रमेश वाणी सर्व शहर पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य मधूभाऊ काटे यांच्या सह पंचायत समितीचे सदस्य आजी माजी सभापती, युवा मोर्चा अध्यक्ष समाधान मुळे व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी सदस्य , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.