शिंदाड शालेय शिक्षण समिती अध्यक्ष पदी संदीप बोरसे,तर उपाध्यक्ष पदी विनोद तडवी यांची निवड.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०९/२०२१
पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड नुकतीच घेण्यात आली. निवडणुकीत अध्यक्षपदी मा.श्री. संदीप शांताराम बोरसे तर उपाध्यक्षपदी मा.श्री. विनोद कचरू तडवी यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठीची निवडणुक सोमवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी ११.३० वाजता शिंदाड येथील जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आली. यावेळी १० सदस्य उपस्थित होते. पैकी ८ सदस्यांनी संदीप शांताराम बोरसे यांचे नावाला तर उपाध्यक्ष पदासाठी विनोद कचरू तडवी यांचे नावाला बोट वर करुन पसंती दिली.
यावेळी नवनिर्वाचित सदस्य पूनम प्रदीप श्रावणे,कोकिळा धनंजय पाटील,कविता दगडू तांबे,सोनल श्रीकांत पाटील,रहेमान मशीद तडवी,सुलताना शकील तडवी,तुषार भगवान सांबरे,दिलशान विनोद तडवी उपस्तीत होते मुख्याध्यापक प्रशांत पाटील यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले
नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार सरपंच ज्ञानेश्वर तांबे,उपसरपंच नरेंद्र पाटील यांनी केला ग्राम पंचायत सदस्य संदीप सराफ ,स्वप्नील पाटील,विलास पाटील,धनराज पाटील,प्रदीप श्रावणे,दशरथ पाटील,राजू तडवी,धनंजय व्यवहारे,शशिकांत निकम,श्रीकांत पाटील, पिंटू सुतार उपस्तीत होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप बोरसे,उपाध्यक्ष विनोद तडवी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.