शेंदुर्णी येथे स्वच्छता पंधरवाड्याच यशस्वी नियोजन सुरवात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०८/२०२१
भारत सरकार युवा व क्रीड़ा मंत्रालय ,नेहरू युवा केंद्र आणि ग्लोबल युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे स्वच्छता पंधरवाड्याचे यशस्वी नियोजन सुरु आहे. १५ ऑगस्ट पर्यंत हा सेवाभावी उपक्रम चालणार आहे .ग्रामीण भागातल्या लोकांना रोगराईच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घेऊन स्वच्छतेचं महत्व समजावुन स्वयंसेवकांना (NYV) कु.शुभांगी वि.फासे यांनी स्वच्छतेची शपथ देवून २ ऑगस्ट रोजी या स्वच्छता अभियानाला प्रारंभ केला.
(NYV)रविंद्र बोरसे यांनी गावांत स्वच्छता मोहिमे अंतर्गत पोस्टर कैम्पेन,जनजागृतीपर रॅली,निबंध स्पर्धा यासारख्या कार्यक्रमांचे आगामी आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सागर बोडके,रोहित माळी,युथ क्लब मेंबर चेतन बारी ,रितेशपाटील,अमृता बारी,अश्विनी सपकाळ,सेजल चव्हाण यांनी मेहनत घेतली.
सोबतच नेहरू युवा केंद्र मार्फ़त राष्ट्रनिर्मिती व देशभक्तीच्या भावना युवक युवतींमध्ये जागृत व्हाव्यात यासाठी जामनेर तालुक्यातील गावागावांतल्या तरुणांना नेहरू युवा केंद्राला जास्तीत जास्त उपक्रम व लोकहिताच्या योजना प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जोडले जात आहे.तालुक्यातील ज्या गावांतल्या तरुणांना सामाजिक कार्य करण्याची आवड आहे त्यांनी तालुका समन्वयकांशी संपर्क करावा.असे आवाहन ही या अभियाना दरम्यान करण्यात आले आहे.