कोल्हे जिल्हापरिषद शाळेच्या शाळा खोली बांधकाम रस्ते कोक्रेटीकरण तसेच विविध विकास कामांचे भूमिपून संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०८/२०२१
अंबे वडगाव येथून जवळच असलेले कोल्हे हे अत्यंत छोटेसे गाव परंतु या गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या एकोप्याने गाव विकासासाठीच्या सततच्या प्रयत्नातुन व जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समित सदस्य, आमदार यांच्या विविध निधीतून कोल्हे गावाचे कोल्हापूर होईल अशी प्रगतीकडे घोडदौड सुरु असलेल्या कोल्हे गावात दिनांक ४ ऑगस्ट बुधवार रोजी जिल्हापरिषद नवीन शाळा खोलीचे तसेच रस्ते काँक्रीटीकरणाचा भूमीपूजनाचा तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम कोल्हे गावासाठी आजपर्यंत लाखो रुपयांच्या शासकीय योजना देणारे एकमेव जिल्हापरिषद सदस्य मा.श्री. मधुकर भाऊ काटे यांच्या हस्ते संपन्न झाला.
या भूमीपूजन सोहळा संपन्न झाल्यानंतर एका छोटेखानी कार्यक्रमात कोल्हे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी जिल्हापरिषद सदस्य मा.श्री. मधुकर भाऊ काटे, पिंपळगाव हरेश्वरचे डॉ. मा.श्री।शांतीलाल तेली, पिंपळगाव हरेश्वरचे माजी सरपंच मा.श्री.अशोक पाटील व इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या भूमीपूजन सोहळ्यासाठी कोल्हे येथील सरपंच मा.श्री. अशोक सुरडकर, उपसरपंच सौ.मुन्नी शिंदे, माजी सरपंच मा.श्री.रमेशचंद्रजी बाफना, ग्रामपंचायत सदस्य मा.श्री. खंडू माळी,श्रीमती लताबाई पाटील,सौ. सपना गोपाळ, बबलू तडवी, श्रीमती दगूबाई धनगर तसेच गावकरी उपस्तीत होते. तसेच जिल्हापरिषद शाळेचे मुख्याधापक मा.श्री. प्रशांत बडगुजर तसचे त्यांची सर्व उपशिक्षक सह उपस्तित होते. कार्यक्रमांचे सूत्र संचालन देवरे सरांनी केले, प्रास्ताविक समीर शिंदे , आभार मुख्याधापक बडगुजर सर यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हापरिषद सदस्य मा.श्री।मधुकर भाऊ काटे हे होते.