सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोरा येथील संभ्रमित गाळे लिलावाला अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी घातले निर्बंध

पाचोरा येथील संभ्रमित गाळे लिलावाला अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी घातले निर्बंध

By Satyajeet News
November 3, 2020
476
0
Share:
Post Views: 37
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

*भाजी-विक्रेते,व्यापारी व सामान्य नागरिकांसाठी अमोल शिंदे यांनी केलेल्या तक्रारीला यश*

दिलीप जैन. (पाचोरा)
गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेल्या पाचोरा नगरपरिषदेच्या भाजीपाला मार्केट जागेवरील बांधलेल्या व्यापारी संकुलातील संभ्रमित गाळे लिलाव प्रक्रियेला अखेर मा.जिल्हाधिकारी यांनी आज दि. ३ नोव्हेंबर २०२० रोजी याबाबतीत आर्थिक व्यवहारावर निर्बंध घालनारे आदेश पारित केले आहे.

यात प्रामुख्याने भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी भाजीपाला विक्रेते व व्यापारी आणि सामान्य नागरिकांशी या विषयावर त्यांची मते जाणून घेऊन सविस्तर चर्चा करून दिनांक २२ ऑक्टोबर २०२० रोजी महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ३०८ नुसार तक्रार दाखल केली होती.सदर व्यापारी संकुलात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कामे झाली असून,सदर बांधकाम पूर्ण होऊन विकासकाकडुन हस्तांतरित न करून घेता,इलेक्ट्रिक फिटिंग, इलेक्ट्रिक मीटर, लिफ्ट,संपूर्ण संकुलाला अग्निशमन सुरक्षा कायद्या नुसार संपूर्ण संकुलात अग्निशमन यंत्रणा व इतर अनुषंगिक बाबी इ. कुठलीही व्यवस्था पूर्णत्वास आलेले दिसून येत नव्हते,

त्यासोबतच बेकायदेशीररित्या लिलावप्रक्रिया राबवून सामान्य नागरिक व व्यापारी यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून ही संपूर्ण प्रक्रिया संभ्रमात पाडणारी असल्याने त्यात कुठलीही बाब स्पष्ट नसून या सर्व बाबींची पूर्तता करूनच लिलाव करावा आणि गाळ्यांचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत व्यापारी व सामान्य नागरिकांकडुन कुठलीही रक्कम त्यांच्याकडून स्वीकारू नये ज्यावेळी व्यापारी संकुलाचे काम पूर्णपणे पूर्णत्वास येईल त्यावेळी गाळे हस्तांतरित करताना व्यापारी व सामान्य जनतेकडून पैसे घ्यावेत अशीही मागणी अमोल शिंदे यांनी या तक्रार अर्जात केली होती. त्यावर मा. जिल्हाधिकारी यांनी निर्णय देताना अशे आदेश पारित केले की

१).अर्जदार यांचा महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ३०८ प्रमाणे केलेला अर्ज दाखल करुन घेणेत येत आहे.

२).दि.०४/११/२०२० रोजी होणा-या लिलाव प्रक्रीयेत कामाचा पुर्णत्वाचा दाखला व इतर अनुषंगिक बाबी ई. सर्वाची पुर्तता करुन आदेश दिनांकापासुन ३ आठवडयात स्वयंस्पष्ट अहवाल सादर करावा.

३).कामाचा पुर्णत्वाचा दाखला व इतर अनुषंगिक बाबी ई. सर्वाची पुर्तता होत नाही तोपर्यत लिलावात सहभागी झालेल्या गाळेधारकांबरोबर कोणताही आर्थिक व्यवहार करु नये. तसेच कोणत्याही गाळेधारकास गाळा ताब्यात देण्याची प्रक्रीया करु नये..

४).नगरपरिषदने आर्थिक व्यवहार व ताबा प्रक्रियाबाबत अटी व शर्तीमध्ये बदल करावा. तसेच इकडील कार्यालयाच्या परवानगीशिवाय गाळेधारकांकडुन कोणताही आर्थिक व्यवहार आणि ताबा प्रक्रीया बाबत कारवाई करु नये.

असे आदेश आज मा.जिल्हाधिकारी यांनी पारित केले

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले की गाळे लिलावास आमचा कुठलाही विरोध नसून लिलाव प्रक्रिया ही संपूर्णपणे पारदर्शक व सर्व जनतेचे हित जोपासुन शासनाच्या नियमावलीनुसार ही प्रक्रिया पार पाडावी, तसेच या प्रक्रियेत पूर्णपणे माहिती घेतली असता सदर व्यापारी संकुलात आज पावतो बांधकाम पूर्ण होऊन विकासकाकडुन हस्तांतरित न करून घेता,इलेक्ट्रिक फिटिंग, इलेक्ट्रिक मीटर, लिफ्ट,संपूर्ण संकुलाला अग्निशमन सुरक्षा कायद्या नुसार संपूर्ण संकुलात अग्निशमन यंत्रणा व इतर अनुषंगिक बाबी इ पूर्णत्वास आलेल्या दिसून येत नाही त्यासोबतच अतिशय त्रोटक व मोघम स्वरूपाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यात दुकानाचे क्षेत्रफळ, दरमहा भाडे,सरकारी अनामत रक्कम, तसेच इतर महत्व पूर्ण बाबींचा कुठेही उल्लेख केलेला नव्हता,तरी सुद्धा लिलावाची एवढी घाई का ? कुठलेही बांधकाम पूर्ण नसताना लिलाव प्रक्रिया व गाळे विक्री करण्याचा घाट आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात असलेल्या सत्ताधारी नगरपालिकेने घातला असून याच्या मागचे नेमके गौड-बंगाल काय आहे.? असा प्रश्नयावेळी अमोल शिंदे यांनी उपस्थित केला.

ह्या संबंधित सर्व भाजी-विक्रेते, व्यापारी आणि सामान्य नागरिकांच्या मागणीला आम्ही पाठिंबा दर्शवून त्यांच्या वतीने भारतीय जनता पार्टी तर्फे प्रातिनिधिक स्वरूपावर मी मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.तसेच ह्या सर्व संभ्रमामुळे मी तक्रार द्वारे विचारणा केली होती. त्यात मा.जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे आज मी स्वागत करतो, आणि मा. जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील आदेश देई पर्यंत या प्रक्रियेतील सर्व व्यवहारावर आर्थिक निर्बंध घातले आहेत. जनेकरून यात सामान्य नागरिकांची व व्यापाऱ्यांची कुठलीच फसवणूक होणार नाही.त्यामुळे मी मा. जिल्हाधिकारी यांचे आभार व्यक्त करतो असे यावेळी अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

मंत्र्यांनी स्वत:चा खिसा गरम करण्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक ...

Next Article

पाचोर्यात नपा गाळेंचा लिलाव होणार लहान व्यापारींनी ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    अंबे वडगाव येथे कापूस खरेदीचा शुभारंभ प्रसंगी ७१००/०० रुपये भावाने खरेदी.

    September 19, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    गावातील डुक्करे धरुन न्या व बक्षीस मिळवा.

    December 7, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    भडगांव महावितरण हल्ला प्रकरणातील करविता धनी शोधून त्यास तात्काळ अटक करावी- भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे

    June 13, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    श्री.गो. से. हायस्कुल, पाचोरा येथे नवनियुक्त पर्यवेक्षक यांचा सत्कार

    October 31, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्हा गोशाळा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. बन्सीलाल दुगड तर सचिवपदी दिपक पाटील.

    December 2, 2024
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    अंबे वडगाव व सावखेडा गाव शिवारात पिसाळलेल्या कुत्र्याचा उपद्रव.

    January 17, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    सावखेडा येथील मंगलसींग परदेशी यांच्यावर मंगळवारी सकाळी शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार.

  • पाचोरा तालुका.

    अनाथांच्या नाथ सिंधुताई सपकाळ यांना कुऱ्हाड येथे सर्वपक्षीय श्रद्धांजलीपर शोकसभा.

  • पाचोरा तालुका.

    तपासी अधिकाऱ्यांनी माझ्याविरुद्ध खोटा अहवाल बनवल्याचा कुऱ्हाड बुद्रुक येथील सरपंच उदेसिंग वंजारी यांचा आरोप.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज