अंबे वडगाव गावातील वाढते अतिक्रमण काढण्यासाठी लवकरच मोहीम.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०९/२०२२

पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव गावात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढतच असून ते काढण्यासाठी लवकरच कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी ग्रामपंचायतीला भाग पाडणार आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की अंबे वडगाव गावाचा सिटीसर्वे झालेला आहे. तरीही अंबे वडगाव येथील सधन, सुशिक्षित, मनमानी करणाऱ्या काही ग्रामस्थांनी गावभर अतिक्रमण करण्याचा प्रताप सुरु केला आहे. तर काही भागात व गल्लीबोळात अगोदरच मुख्य वहिवाटीच्या रस्त्यावर अतिक्रमण करुन रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण केला आहे.

यामुळे गावात बैलगाडी, चारचाकी स्वयंचलित वाहणे गावात येत नसल्याने धनधान्य किंवा खते तसेच रुग्णवाहिका गावात आणणे मुश्किल झाले आहे. विशेष म्हणजे दुचाकी सुध्दा गावातील गल्लीबोळात फिरु शकत नाही म्हणून तातडीने अतिक्रमण काढणे गरजेचे झाले आहे.

म्हणून याबाबत सिटीसर्वे (भुमी अभिलेख) कार्यालय तसेच संबंधित विभागाकडून लवकरच अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम राबवणे गरजेचे लवकरात लवकर याकरिता पाठपुरावा करण्यात येणार आहे.

ब्रेकिंग बातम्या