डोंगरगावचे माजी सरपंच पंढरीनाथ पाटील याचे दुखद निधन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०५/२०२१
पाचोरा येथील साईमतचे पत्रकार मा.श्री.गणेश शिंदे यांचे पाहुणे व डोगरगांवचे माजी सरपंच, सदस्य पंढरीनाथ मांगो पाटील. याचे आज उपचारादरम्यान निधन झाले. डोंगरगावचा अतिशय प्रामाणिक, मनमिळावू स्वभावाचा, जनसामान्यांसाठी देव माणूस ओळखला जाणारा एक सच्चा समाजसेवक आपल्यातून हरवल्याची खंत परिसरातील जनतेतून व्यक्त केली जात आहे.
सगळ्यांना आपल्या हक्काचा माणूस म्हणून वाटणाऱ्या पंढरीनाथ पाटील यांनी आज दु ३.३० वाजता या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता माहित पडताच झाले संपूर्ण गाव परिसरासह तालुक्यातील जनतेला धक्काच बसला.
कारण पंढरीनाथ पाटील हे मराठा समाजातील जेष्ट,श्रेष्ठ,अष्टपैलू व्यक्तीमत्व होते.त्यांनी डोंगरगावचे सरपंचव सदस्यपद भुषवत ग्रामपंचायतचें जनता प्रबोधन बहुद्देशीय संस्थेचे सदस्यही होते. डोंगरगावात सामाजिक,धार्मिक,लग्नसमारंभ असला म्हणजे पंढरीनाथ पाटील यांच्या सल्ल्याशिवाय व सहभागाशिवाय होत नव्हते.गावात कोणालाही वैद्यकीय सेवेसाठी मदत लागल्यावर पंढरीनाथ पाटील हे स्वता त्या आजारी व्यक्ती सोबत जाऊ डॉक्टरांशी चर्चा करुन कमीत कमी खर्चात उपचार मिळवून देत वेळप्रसंगी ते पदरमोडही करत परंतु रुग्णसेवा करणे हा त्यांचा स्वभावगुणाच होता. तसेच गावातील होणारे वादविवाद,भांडण तंटे गावातच मिटवून गावातील सलोखा टिकवून ठेवण्यात त्यांचा हातखंडा होता.
त्यांची संपूर्ण कारकीर्द म्हणजे जनसेवा हिच ईश्वर सेवा समजून जगणारा अतिशय प्रामाणिक,मनमिळाऊ, शांतताप्रिय जनसेवक म्हणून आठवणीत राहील. अश्या पंढरीनाथ पाटील यांच्या पाश्चात तीन भाऊ, आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई, नात, असा मोठा परिवार आहे.त्याच्या निधनानंतर गावात शोककळा पसरली असून पंचक्रोशीतील जनता आज एका सच्चा समाजसेवकाला मुकली आहे.