खेडेगावात येत नाही लालपरी, विद्यार्थ्यांना रहावे लागते घरी. जामनेर तालुक्यातील एकुलती व दोंडवाडा येथील बस अभावी विद्यार्थ्यांचे हाल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/१२/२०२०
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी हे गाव म्हणजे शिक्षणाची पंढरी म्हणून शेंदुर्णी येथे जामनेर, पाचोरा, सोयगाव तालुक्यातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात.
परंतु कोरोणाकाळात लॉगडाऊन सुरु झाल्यापासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या व मागील आठवड्यात माध्यमिक शाळांचे इयत्ता ९ ते १० वीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थी शालेयश शिक्षण घेण्यासाठी शेंदुर्णी येथे येत आहेत.
परंतु राज परिवहन मंडळाच्या एसटी बसेस अजुनही ग्रामीण भागात नियमितपणे येत नसल्याने विद्यार्थ्यांना व दैनंदिन कामासाठी तालुका व जिल्ह्यावर जाणाऱ्या ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
महत्त्वाचे म्हणजे मागील काही महीन्यापासून शाळा बंद असल्याने आपला अभ्यासक्रम पूर्ण होईल की नाही या विवंचनेत विद्यार्थीवर्ग होता. व आता शाळा सुरु झाल्यावर आभ्यास कसा पूर्ण होईल या प्रयत्नात विद्यार्थी धावपळ करत आहेत. परंतु महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या कमी केल्याने विद्यार्थ्यांना कधी पायपीट तर कधी अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
या अडचणीतून जामनेर तालुक्यातील चिलगाव व दोंडवाडा ही गावे सुध्दा सुटलेली नाहीत. या गावातील जवळपास शंभर ते दिडशेच्या जवळपास विद्यार्थी शेंदुर्णी येथे शिक्षण घेण्यासाठी येतात परंतु यांना जाणे येणे साठी एसटी बस नसल्याने घरी जातांना सायंकाळी आठ वाजेपर्यंत वाहनांची वाट पहात निर्जन रस्त्यावर जिव मुठीत धरून थांबावे लागते व खुपच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.म्हणून सकाळी दहा वाजेच्या सुमारास एकुलती येथून शेंदुर्णी येण्यासाठी व सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेंदुर्णी येथून एकुलती व दोंडवाडा जाण्यासाठी एसटी बसची त्वरित व्यवस्था करावी अशी मागणी सुज्ञ नागरिक व विद्यार्थ्यांवर्गाकडून होत आहे.