विवाहितेच्या खून प्रकरणी अटकेतील ३ आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०२/२०२२
पाचोरा तालुक्यातील नाचनखेडा शिवारातील शेतात राहत्या घरातील पलंगावर मनीषा चेतन राठोड (२४) ही विवाहिता मृतावस्थेत आढळून आल्याने पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतू मयत विवाहितेच्या नातेवाईकांतर्फे संशय व्यक्त करण्यात आला होता व मृतदेह ताब्यात न घेता घटनेची पोलीस प्रशासनास चौकशीची मागणी करण्यात आली होती. मृतदेहाचा पंचनामा करून जळगावात हलविण्यात आला होता. ५ रोजी मयत विवाहितेचा भाऊ ज्ञानेश्वर जगन्नाथ पवार (३२) (रा. कुंदाने तांडा जिल्हा धुळे) यांनी पाचोरा पोलिसात मयत विवाहितेचा पतीसह चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अटकेतील तिघा आरोपींना न्यायालयाने पोलीस कोंडी सुनावली. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजेपुर्वी वेळ नक्की नाही गाळण, विष्णुनगर भागातील नाचनखेडा शिवारात असलेल्या शेतातील घरात आरोपी पती चेतन दलेरसिंग • राठोड, छायाबाई जयसिंग राठोड, जयसिंग दलेरसिंग राठोड, भगवान दलेरसिंग राठोड (सर्व रा. गाळण विष्णुनगर, ता. पाचोरा) यांनी मयतमनीषा हिस क्रुझर गाडीचे हप्ते फेडण्यासाठी माहेरून पैसे घेऊन ये, तसेच पती चेतन व जेठाणी यांचे अनैतिक संबंध असल्याचे मयत विवाहितेने पाहिल्याच्या कारणावरून चापटा बुक्क्यांनी मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करून गांजपाठ केला व जीवे ठार मारले अशी फिर्याद मयत विवाहितेचा भाऊ ज्ञानेश्वर पवार याने पाचोरा पोलिसात दाखल केल्याने वरील सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात ● आला आहे. संशयित आरोपी पती चेतन राठोड, जयसिंग राठोड, भगवान राठोड यांना अटक करण्यात आली. या आरोपींना रविवारी पाचोरा न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे करीत आहे.