काळखेडा सारगाव ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम, दारू दुकानाची जागा स्पर्धा परीक्षा केंद्राला.प्रहार जनशक्ती संघटनेतर्फे लवकरच जाहीर सत्कार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०७/२०२१
दिनांक २३ वार शुक्रवार रोजी जामनेर तालुक्यातील काळखेडा – सारगाव सरपंच, उपसरपंच रामेश्वर दांडगे व आपल्या गावातील ग्रामपंचायत सदस्य श्री. मनोज पाटील, सतीश बनसोडे, राजू पिंपळे व प्रकाश जाधव व काळखेडा सर्व ग्राम पंचायत सदस्य यांचा उपस्थितीत आणि यांच्या अथक प्रयत्नातून वादग्रस्त, दारूचे दुकानाच्या जागेवर पंचनामा करून ,मागील ठराव दारूच्या दुकानाचा ठराव रद्द करून सरपंच साहेब यांचा सहीने ही जागा गावातील गरजू, अभ्यासु मुलांना वाचनालय म्हणून देण्याचा ठराव करण्यात आला व ग्रामसेवक भाऊसाहेब यांच्या उपस्थितीत लगेच पंचनामा करून वाचनालय इमारत चे उदघाटन सरपंच व उपसरपंच रामेश्वर दांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
गावातील दारूच्या दुकानाची घाण बाजूला काढून त्या जागा वाचनालय जागा देऊन चांगल्या कामाची सुरुवात केली त्या बद्दल काळखेडा-सारगाव ग्राम पंचायत. सरपंच ,उपसरपंच श्री. रामेश्वर दांडगे व ग्राम पंचायत सदस्य मनोज पाटिल, प्रकाश जाधव ,सतीश बनसोडे व राजू पिंपळे यांचे जय भवानी मित्र मंडळ तर्फे मनःपूर्वक अभिनंदन व आभार करण्यात येत आहे.
ग्रामस्थांच्या चांगल्या निर्णयाचे प्रहारने स्वागत केले असून
सर्वांच्या हातून असेच उत्कृष्ट ,चांगले गावाच्या विकासासाठी कार्य घडावे म्हणून प्रहार तर्फे लवकरच सत्कार करण्यात येणार आहे.
Advertisements