माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी कार्यकर्त्यासह घेतली माजी मंत्री एकनाथराव खडसेंची भेट
दिलीप जैन.(पाचोरा)
माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी आपल्या कार्यकर्त्यासह मंत्री एकनाथराव खडसे यांची जळगाव येथे नुकतीच भेट घेतली या भेटी प्रसंगी या दोघ नेत्यांची जवळपास तासभर सविस्तर चर्चा झाली
या चर्चेत पुढील काळातील मोर्चेबांधणी बद्दल चर्चा होऊन पाचोरा येथे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या सत्काराचा भव्य कार्यक्रम घेण्यात येणार असून या प्रसंगी पाचोरा , भडगाव तालुक्यातील भाजपावर नाराज व खडसेप्रेमी हजारो कार्यकर्ते राष्ट्रवादीपक्षात प्रवेश करणार आहेत
म्हणून हा माजी मंत्री खडसेंचा सत्काराचा कार्यक्रम दोघेही तालुक्यातून आगळावेगळा ठरणार असल्याचे बोलले जात आहे
जळगाव भेटीच्या वेळी पाचोरा तालुक्यातीलखालिल दादा देशमुख जिल्हाप्रवक्ते, नितीन तावडे,विधानसभा क्षेत्र प्रमुख, विजूअप्पा पाटील तालुकाध्यक्ष, विकास पाटील सभापती पा. पु.नगरपालिका, पाचोरा,रणजित पाटील,माजी नगरसेवक, संतोष परदेशी, ओबीसी अध्यक्ष, किरण देवरे,विध्यार्थी अध्यक्ष.. संजय पाटील….आदी कार्यकर्ते उपस्थित होते
( काही दिवसांपूर्वी सत्यजीत न्यूजने खडसेप्रेमी कार्यकर्ते राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारी मात्र पहेले तुम , पहेले तुम या शिर्षकाखाली बातमी प्रसारित केली होती माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी संधीच सोन करुन घ्यावे असे सुचवले होते याचीच दखल घेत दिलीपभाऊ वाघ यांनी कामाला सुरुवात केली असून सत्यजीत न्यूजचे आभार मानले आहेत.)