अंजनविहिरे येथील पाटील कुटुंबियांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील ठरले देवदूत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०५/२०१
आजच्या प्रगत युगात मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियाचा मोठ्याप्रमाणात वापर होत आहे. दिल्लीची बातमी गल्लीत व गल्लीतील बातमी दिल्लीत काही क्षणातच पोहचते.यातून बरेच काही बरेवाईट अनुभव येतात मात्र पाचोरा तालुक्यातील एका परिवाराला ऐन संकटाच्या वेळी सोशल मिडीयाचे माध्यमातून एकुण पंधरा हजार रुपये मदत मिळाली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील अंजनविहिरे गावचे सरपंच शशिकांत पाटील यांना म्युकरमायकोसीस या आजाराने ग्रासले मनमिळावू स्वभाव, समाजसेवेचा वसा हाती घेत सरपंचपदी विराजमान असलेतरी परिस्थिती जेमतेम असल्याने आजाराचे नाव ऐकताच घरात चिंतेचे वातावरण उपचारासाठी पैशाची अत्यंत गरज वडीलांच्या उपचारासाठी पैसे जमा कसे करायचे हा मोठा प्रश्न असे असतांनाही धीर न सोडता शशिकांत पाटील यांच्या गायत्री या मुलीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून सत्य परिस्थिती कथन करत उपचारासाठी मदतीसाठी हाक दिली.
सोशल मिडीयावरील मदतीचा संदेश पाचोरा शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व पाचोरा शहरात आरोग्यदूत व देवदूत म्हणून ओळख असलेले विकास पाटील सर यांच्या वाचण्यात आली त्यांनी लगेचच आपल्या मित्रपरिवाराला मदतीसाठी हाक दिली त्यांच्या मित्र परिवाराने प्रतिसाद देत ऐपतीप्रमाणे शंभर रुपयांपासून तर हजारो रुपयांपर्यंत मदत जमा करून दिली.
तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक देवदूत व आरोग्यदूत म्हणून ओखले जाणारे विकास पाटील सर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथील मुळ रहिवासी व सद्या मुंबईत वास्तव्याला असलेले राज बकेटचे मालक माननीय शब्बीर शेख साहेब यांनी पंधरा हजार रुपये ऑनलाईन पाठवले.
अश्याप्रकारे गुगल पे, फोन पे व इतर माध्यमातून ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे विकास पाटील सर यांनी मनपूर्वक आभार मानले तसेच अंतुर्ली येथे शशिकांत पाटील यांच्या घरी जाऊन तब्बेतीची विचारपूस करत जमा झालेली रक्कम मदत म्हणून दिली.
यावेळी अंजनविहिरे येथे पाचोरा शिवनेरी पतसंस्थेचे चेअरमन मा.श्री.राहुल बोरसे प्रा.प्रदीप वाघ, पाचोरा शहराध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुदर्शन सोनवणे,प्रा.नितीन.पाटील,प्रशांत बोरसे,मयुर पाटील,गौरव पाटील, उमेश एरंडे, सचिन शिंदे व कार्यकर्ते मित्रपरिवार उपस्थित होते.
या जगात अजूनही चांगली माणसे आहेत. म्हणूनच हे जग चालत आहे. माझी कुणाशीही जास्त ओळख नसतांनाही माझ्या मुलीच्या सोशल मिडीयावरील दिलेल्या मदतीच्या हाकेला हाक देत आपण सगळ्यांनी ऐनवेळी मदत केली याबद्दल मी आपल्या सगळ्यिंचा ऋणी आहे असे मत व्यक्त करून सहकार्य केल्याबद्दल शशिकांत पाटील यांनी आभार मानले.