मानव संरक्षण समिती नवी दिल्लीच्या भडगांव तालुका महिला अध्यक्षपदी नगरसेविका योजनाताई पाटील यांची नियुक्ती.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०७/२०२१
मानव संरक्षण समिती नवी दिल्ली (रजि.भारत सरकार) समितीच्या भडगांव तालुका महिला अध्यक्षपदी नगरसेविका योजनाताई पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मानव सरंक्षण समिती नवी दिल्ली (रजि.भारत सरकार) समितीचे अध्यक्ष विजयजी कुराडे यांचे आदेशान्वये महाराष्ट्र,गुजरात,गोवा,कर्नाटक,तेलंगणा राज्याचे हेड जनसंपर्क अधिकारी मा.श्री. गजाननजी भगत यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्याध्यक्ष शिवाजीराव पाटील,महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्ष इंदुताई यादव यांनी मानव संरक्षण समिती नवी दिल्ली (रज़ि.भारत सरकार) भडगांव तालुका महिलाध्यक्षपदी योजनाताई दत्तात्रय पाटील यांची सामाजिक योगदानासह विविध क्षैत्रातील निश्वार्थ जनसेवा कार्याची दख़ल घेत नियुक्ति जाहीर केली आहे.
सदर नियुक्तिनिमित्त महाराष्ट्र राज्य महिला जनसंपर्क अधिकारी डॉ.शुभांगी रत्नपारखी,उत्तर महाराष्ट्र महिला संघटक माधुरी उदावंत तसेच पाचोरा तालुकाध्यक्ष शशिकांत दुसाने,सचिव महेश कौडिण्य,जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील,कायदेशीर सल्लागार मानसिंग सिध्दू,पाचोरा महिलाध्यक्ष मंदाकिनीताई पाटील,उपाध्यक्षा किरणताई पाटील,सचिव स्वातीताई पाटील यांचे सह विविध क्षैत्रातील मान्यवर पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी योजनाताई पाटील यांना मानव संरक्षण जनसेवा कार्यास अभिनंदनपर शुभेच्छया दिल्या आहेत.