पाचोरर्यात ओबीसी आरक्षण साठी कॉँग्रेस चे भाजपा विरोधात आंदोलन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०६/२०२१
देशाला आरक्षण देणारे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पाचोरा काँग्रेस ने ओबीसी आरक्षण साठी आंदोलन केले.
देशातील लोकांना आरक्षणची गरज असुन सर्व प्रथम आरक्षण देणारे छत्रपती शाहू महाराज यांच्या जंयतीचे औचित्य साधून कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा अध्यक्ष अॅड संदीप पाटील यांच्या सुचनेवरुन पाचोरा काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा मोदी सरकार ओबीसी आणि मराठा बांधवांची फसवणूक करुन देशात हुकुमशाही आणु पहाणार्या विरोधात कॉँग्रेस कडुन निदर्शने करण्यात आले.
निदर्शने सुरू करण्या आधी छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कॉँग्रेस च्या घोषणांनी चौक दणाणला होता यात आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, मोदी तेरी तानाशाही नही चलेगी नही चलेगी, नही चाहीए सोना चांदी हमे चाहीए राहुल गांधी, ओबीसी सह मराठा समाजाला फसवणार्या भाजपा सरकारचा निषेध असो अशा घोषणांचा समावेश होता.
यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण,तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, जेष्ठ पदाधिकारी शेख इस्माईल शेख फकीरा, किशोर गरुड, गणेश गायकवाड, महीला तालुका अध्यक्षा अॅड. मनिषा पवार, जिल्हा उपाध्यक्षा संगिता नेवे, सरचिटणीस कुसुमताई पाटील,क्रांती पाटील, रेखा पाटील युवक विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले,शिवराम पाटील, इस्माईल तांबोळी, संजय सोनार, दिपक सोनवणे, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते. कॉग्रेस च्या निदर्शनाची चर्चा शहरात सुरू होती.