पाचोरा नगरपरिषदेतर्फे प्लॅस्टीकच्या कॅरी बॅग वापरणारावर धडक मोहीम राबवून कडक कारवाईची गरज.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०६/२०२१
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०६/२०२१
म.सचिव सो. महाराष्ट्रक राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांचेकडील परिपत्रक महाराष्ट्रत प्लॅस्टीक व थर्माकोल अविघटनशिल वस्तूंदचे (उत्पािदन, विक्री, वापर, वाहतुक, हाताळणी, साठवणूक) अधिसुचना २०१८ नूसार प्लॅस्टीक कॅरी बॅग, नॉन ओव्हरन पिशव्याव, वापरास बंदी घातलेली आहे. त्याच प्रमाणे शासनाच्या “माझी वसुंधरा” अभियानातील विविध उपायाअंतर्गत दिनांक १६/१२/२०२० रोजी पाचोरा शहरातील विविध प्लॅस्टीक पिशव्यांची (सिंगल युज) विक्री करणा-या दुकानांवर जप्तीची धडक मोहिम राबविण्यांत आली.
तसेच नगरपरिषदेकडून पथक तयार करण्यात आलेले असून शहरातील सुमारे १५ दुकानदानांकडून प्लॅस्टीक पिशव्या जप्त करुन रक्कम रुपये ७५००/- तसेच मास्क न लावणा-या दुकानदारांकडून रक्कम रुपये २०००/- मात्र दंड वसूल करण्यात आला. यापुढे देखील दररोज शहरातील आस्थापना,दुकाने, फेरीवाले, हॉटेल्समध्ये अनाधिकृतपणे व शासनाने बंदी घातलेल्या प्लॅस्टीक पिशव्या जप्त करण्याहची धडक मोहिम सुरुच राहणार असून सुचना देऊन देखील पुन्हा-पुन्हा बंदी असलेल्या प्लॅस्टीक पिशव्या विक्री करणा-या दुकानदारांविरुध्दा कडक दंडात्मवक कारवाई केली जाणार आहे. यात प्रथम गुन्ह्या साठी रु. ५०००/-, दुस-या गुन्ह्या साठी १०,०००/- व तिस-या गुन्ह्या साठी रु.२५,०००/- तसेच ३ महिने कैद अशी दंडाची तरतूद असल्याकने नागरीकांनी देखील प्लॅदस्टीाक पिशव्यांचा वापर पुर्णपणे बंद करुन घरुनच कापडी पिशवी घेऊन बाहेर पडावे व शहरातील विघटन न होणा-या कच-यात भर टाकू नये तसेच आपल्या घरात निर्माण होणारा कचरा हा उघडयावर न टाकता घंटा गाडीत ओला व सुका कचरा वेगवेगळा करुनच द्यावा, शहरातील सामाजीक संस्थांशी संपर्क करुन प्लॅास्टीक बंदी मोहीमेत उत्स्फुलर्त सहभाग नोंदवावा तसेच प्लॅस्टीक वापराबाबत काही शंका असल्यासस व्यापारी बांधवांनी नगरपरिषदेत येऊन शंका निरसन करण्यांचे देखील आवाहन मुख्यापधिकारी शोभा बाविस्कर यांनी केले.
सदरची मोहीम मुख्याभधिकारी शोभा बाविस्कर यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून मोहीमेत प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, राजेश कंडारे, जयराम बजाज, किशोर मराठे, नरेश आदिवाल, राजू लहासे, निळकंठ ब्राम्हणे, बापु ब्राम्हणे, राकेश फतरोड, वाल्मिक गायकवाड, संजय जगताप, विजय ब्राम्हणे, प्रशांत कंडारे, सुनील वाकडे, अमोल अहिरे, सुशिल सोनवणे,आदी अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.
(आजपर्यंत एका बाजूला हातगाडीवाले किरकोळ प्लॅस्टिक बॅग वापर करणारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते दुसरीकडे मात्र पाचोरा शहरात होलसेल प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग विक्री करणारांवर कारवाई का करण्यात येत नाही. असा प्रश्न सुज्ञनागरीकातुन विचारला जात असून ठोक विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.)