माणुसकी समूहातर्फे लोहारा येथे शहीद दिनानिमित्त हुतात्म्यांना विनम्र अभिवादन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०३/२०२१
लोहारा तालुका पाचोरा येथे आज शहीद दिनानिमित्त सुर्वे वाचनालयात माणुसकी समूहातर्फे हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. माणुसकी समूह वेगवेगळे उपक्रम राबवत असतात यामध्ये आज शहीद दिनानिमित्त वीर भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तरुण समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी वीर भगतसिंग यांच्या कार्याचा सविस्तर परिचय करून दिला. आपल्या तरुण वयात मौज मजा सोडून त्यांनी आपला देश स्वतंत्र व्हावा यासाठी आपले आत्मबलिदान दिले, देश सेवा काय असते याचा आदर्श आपण वीर भगतसिंग,राजगुरू,सुखदेव यांच्या कडून आपण घ्यावा असे आवाहन तरुणांना केले. कवी मंगलदास मोरे यांनी, नमन माझे हुतात्म्यांना, ही आपली कविता सादर केली. सुट्टी वर आलेले जवान चंद्रकांत गीते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला माणुसकी समूह जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर, रमेश लिंगायत, हिरालाल बाविस्कर, कवी मंगलदास मोरे, सीआरपीएफ जवान चंद्रकांत गीते, सुभाष गीते, देवेन्द्रनाथ, माणुसकी समूहाचे सदस्य व गावकरी मंडळी हजर होते.