पिंपळगाव हरेश्र्वर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०७/२०२२
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर शिवारात मंगलाबाई नामदेव बडगुजर यांच्या मालकीच्या गट नंबर १००१/३/१ शेतातील त्यांच्याच मालकीच्या चार (बकऱ्या) शेळ्यांवर आज दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवत ठार केल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर शिवारात मंगलाबाई नामदेव बडगुजर यांच्या मालकीच्या गट नंबर १००१/३/१ शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या त्यांच्याच मालकीच्या चार (बकऱ्या) शेळ्यांवर आज दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवला हा हल्ला होताच शेतातील इतर शेळ्या व बैलांनी जोरजोरात हंबरडा फोडला हा कल्लोळ पाहून या घटनास्थळापासून अंदाजे ४०० ते ५०० मीटरवर दिपक नामदेव बडगुजर हे शेळ्यांसाठी पाला घेण्यासाठी गेले होते आपल्या शेतातील जनावरं का हंबरडा फोडत आहेत हे पाहण्यासाठी ते माघारी फिरले तेव्हा त्यांच्या समोरच बिबट्या शेळ्यांवर हल्ला चढवत असल्याचे दृष्य पाहून त्यांनी लांबुनच मोठमोठ्याने आरडाओरडा केला यामुळे घटनास्थळावरून बिबट्याने पळ काढला.
बिबट्याला पळवून लावल्यानंतर मोठ्या हिमतीने दिपक बडगुजर यांनी शेळ्या बांधलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये येऊन पाहिले असता त्यांना त्याठिकाणी चार शेळ्या बिबट्याने ठार केल्या असल्याचे दिसून आले. या घटनेमुळे पिंपळगाव हरेश्र्वर शेत शिवारात बिबट्या आढळून आल्यामुळे या शिवारातील शेतकरी व मजूरांमध्ये भिंतीचे वातावरण तयार झाले आहे.
बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या चार शेळ्यांची अंद किंमत साठ हजार रुपयांहून अधिक होती अशी माहिती समोर येत असून वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.