पाचोरा, भडगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तातडीच्या बैठकीचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०३/२०२३
पाचोरा, भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीबाबत प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करुन विचार विनिमय करणे, तसेच आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत विचार विनिमय करुन कार्यकर्त्यांची मते जाणून घेत सभासद नोंदणी आढावा घेऊन सविस्तर चर्चा करण्यासाठी माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २६ मार्च २०२३ रविवार रोजी दुपारी तीन वाजता भडगाव रोडवरील महालपुरे मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या बैठकीला राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मा. श्री. विकास पाटील सर, विधानसभा क्षेत्रप्रमुख मा. श्री. नितिन दादा तावडे, पाचोरा तालुकाध्यक्ष मा. श्री. श्याम भोसले, भडगाव तालुकाध्यक्ष मा. श्री. राहुल पाटील, भडगाव कार्याध्यक्ष मा. श्री. विलास पाटील, पाचोरा तालुका युवक तालुकाध्यक्ष मा. श्री. अभिजित पवार, पाचोरा शहराध्यक्ष अझहर खान, विवेक पवार, महिला तालुकाध्यक्ष सौ. रेखाताई देवरे, भडगाव युवक शहराध्यक्ष मा. श्री. अरुण सोनवणे, पाचोराचे मागासवर्गीय सेल तालुकाध्यक्ष मा. श्री. , भडगाव अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष रफुद्दीन शेख, भडगाव कार्याध्यक्ष मा. श्री. हर्षल पाटील, पाचोरा युवक शहराध्यक्ष कुणाल पाटील, भडगाव युवक तालुकाध्यक्ष सौ. रेखाताई पाटील, पाचोरा अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष रज्जाक बागवान यांनी केले आहे.