सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळ वाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›आमदारांसह संशयितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अमोल शिंदे यांची मागणी.

आमदारांसह संशयितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अमोल शिंदे यांची मागणी.

By Satyajeet News
June 10, 2021
419
0
Share:
Post Views: 58
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०६/२०२१

भडगाव-येथे दिनांक ६ जून २०२१ सोमवार रोजी आमदारांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून भडगाव येथील महावितरण कार्यालयावर ताला-ठोको व हल्लाबोल आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनाच्या आधी आमदारांनी कार्यकर्त्यांना उत्साहित व संतप्त अशी चिथावणीखोर वक्तव्य केले परिणामतः भडगाव येथील महावितरण उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांचेसह कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीत वरिष्ठ तंत्रज्ञ गजानन राणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे भडगावात आमदारांच्या नाटकी आंदोलनाने महावितरणाच्या निष्पाप कर्मचाऱ्याचा बळी घेतला असा गंभीर आरोप यावेळी भाजपाचे अमोल शिंदे यांनी केला.

तसेच अशा पद्धतीने महावितरण कार्यालयात जबरी प्रवेश करून अभियंता व वायरमन यांना बेकायदा मारहाण करणाऱ्या व त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या समाजविघातक प्रकृतीचा शोध घेऊन आमदारांसह संशयितांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व मृत कर्मचारी गजानन राणे यांच्या कुटुंबाला शासनस्तरावरून तात्काळ पन्नास लाख रुपये आर्थिक मदत व कुटुंबातील एक व्यक्तीला शासकीय सेवेत तात्काळ सामावून घ्यावे अशी मागणी आम्ही शासन दरबारी लावून धरणार आहोत असे अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले. तसेच मागील सात आठ दिवसापासून पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे महावितरण कंपनीच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य करीत होते. आणि अल्पमतात निवडून आलेल्या आमदारांनी पक्षात स्वतःचे अस्तित्व सिद्ध करून चैतन्य निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या समस्यांचे राजकारण करून महावितरण विरोधात पत्रकार परिषदा घेतल्या होत्या व बातम्या छापून आणल्या होत्या मागील आठवडाभरात आमदारांनी केलेले प्रक्षोभक वक्तव्य,चिथावणी देणारे विधाने
त्यातही प्रामुख्याने आमदार म्हणाले होते की महावितरण अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही तसेच कार्यालयात खुर्चीवर देखील बसू देणार नाही व त्यांच्या आंदोलनामुळे समाजविघातक प्रवृत्तीच्या लोकांना प्रोत्साहन मिळाले आहे. आमदार यांच्या सहेतुक भडक वक्तव्यामुळे अपप्रवृत्तीच्या लोकांना स्फुरण चढले आणि त्यामुळे संबंधित संशयितांनी हे कृत्य केले. आणि ही दुर्दैवी घटना घडली गजानन राणे यांच्या दुर्दैवी मृत्यूचा संपूर्ण घटनाक्रम लक्षात घेता विद्यमान आमदार यांचेसह मारहाण करणाऱ्या संशयितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन यावेळी भाजपचे अमोल शिंदे, भडगाव भाजपा तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील, जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, सरचिटणीस गोविंद शेलार, भुषण देवरे, संजय पाटील, दिपक माने आदी पदाधिरकार्यांनी भडगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांना निवेदन देण्यात आले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

गटविकास अधिकाऱ्याची पत्रकारास गुन्हा दाखल करण्याची धमकी. ...

Next Article

पाचोरा येथे चर्मकार उठाव संघातर्फे.पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    अंबे वडगाव गावाजवळ रहदारीला अडथळा निर्माण होईल असे विद्युत खांब उभारल्याने अपघाताची शक्यता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष.

    February 14, 2023
    By Satyajeet News
  • Uncategorized

    जळगाव जिल्ह्यात आजही ११७९ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर १४ बाधितांचा मृत्यू.

    April 4, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    सावधान जगवाल तर जगाल जल, जमीन अन् जंगले धोक्यात.

    June 5, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    Living over darkness second god.

    July 16, 2015
    By SURAJ DEOHATE
  • Uncategorized

    October 5, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    जिल्ह्यात आज १२०५ कोरोना बाधीत; बळींची संख्या सोळाशेच्या उंबरठ्यावर.

    March 29, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    बी. एस. एफ. जवान चेतन हजारे यांचे कर्तव्यावर असतांना ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन.

  • Uncategorizedक्राईम जगत

    लोहारा येथील माजी उपसरपंच कैलास चौधरी यांना वाचविण्यासाठी पाचोरा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री. धस साहेब यांची धडपड (हेमंत गुरव यांची तक्रार).

  • महाराष्ट्र

    पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीला हिरवा कंदील.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज