वरसाडे येथील श्रीमती कळसाबाई शंकर पवार आश्रमशाळेतील महिला कर्मचाऱ्याच्या नशिबी १२ वर्षांनंतर वनवास.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/११/२०२२
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर येथील ग्रामविकास विद्यालयाचे अंतर्गत असलेल्या वरसाडे तांडा येथील कळसाबाई शंकर पवार माध्यमिक आश्रमशाळेतील सतत १२ वर्षांपासून शालेय पोषण आहार शिजवण्याचे काम करणाऱ्या एका कर्मचारी महिलेला डावलून तीच्या जागी दुसऱ्या वयोवृद्ध महिलेची नियुक्ती केल्याची घटना समोर आली असून ही नियुक्ती मागील काळात कार्यरत असलेल्या संचालक मंडळाने मागील महिन्यात ग्रामविकास विद्यालयाच्या संचालक मंडळाच्या निवडणुक काळाच्या गडबडीत सावळा गोंधळ करुन व आर्थिक देवाणघेवाण करुन केली असल्याचा आरोप बारा वर्षांपासून शिलेय आहार शिवजवणाऱ्या महिलेने केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पिंपळगाव हरेश्र्वर येथील ग्रामविकास विद्यालयाचे अंतर्गत वरसाडे तांडा येथील कळसाबाई शंकर पवार माध्यमिक आश्रमशाळेत हसीनाबाई मुनीर तडवी या शालेय पोषण आहार शिजवण्याचे काम करत होत्या त्यांच्या सोबत मागील १२ वर्षांपासून सौ. संगीत अनिल राठोड ह्या अल्पशा रोजंदारीवर मदतनीस म्हणून शालेय पोषण आहार शिजवण्याचे काम करत होत्या हे काम करत असतांना हसीनाबाई तडवी ह्या सेवानिवृत्त झाल्यानंतर सौ. संगीत राठोड यांना कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. म्हणून आपल्याला कायमस्वरूपी काम मिळेल या आशेने त्या अल्पशा मोबदल्यात आजपर्यंत काम करत होत्या.
परंतु मागील महिन्यात ग्रामविकास विद्यालयाची संचालक मंडळाची निवडणूक लागली होती व मागील संचालक मंडळ वेगवेगळ्या गैरभाराबाबत झालेल्या चौकशीमध्ये मेटाकुटीला आले होते. व या निवडणुकीत आपण निवडून येणार नाही अशी भिती निर्माण झाली होती. म्हणून त्यांनी संचालक पदावर असतांनाच मागील काळात हसीनाबाई तडवी यांचा कार्यकाळ संपल्यानंतर रीतसर व ठरलेल्या बोली प्रमाणे मागील १२ वर्षांपासून शालेय पोषण आहार शिजवत असलेल्या सौ. संगीत अनिल राठोड यांची नियुक्ती करणे क्रमप्राप्त होते.
किंवा भरती प्रक्रियेसाठी वर्तमानपत्रातून जाहीरात देऊन नवीन कर्मचारी नियुक्त करणे गरजेचे होते. मात्र मागील संचालक मंडळाने सौ. संगीत राठोड यांना कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा कोणतीही जाहिरात किंवा नोटीस (जाहीर सुचना) न देता तसेच शैक्षणिक गुणवत्ता किंवा वयाचे भान न ठेवता त्यांच्या जागेवर भुलाबाई दुधा राठोड अंदाजे वर ४८ वर्षे या वयोवृद्ध महिलेची नियुक्ती केली आहे. परंतु ही नियुक्ती नियमबाह्य शासनाच्या नियमानुसार व वयाच्या अटी शर्तीनुसार झालेली नसून आपल्या हातातून सत्ता जाणारच आहे म्हणून शेवटची कमाई करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण होऊन ही नियुक्ती करण्यात आली असल्याचा आरोप सौ. संगीत राठोड यांनी केला असून सदर भरती प्रक्रियेची चौकशी होऊन त्याजागी माझी कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी असे न केल्यास मी आश्रमशाळेच्या आवारात आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले आहे.