सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • अनफिट, नादुरुस्त स्कूलबसमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, प्रादेशिक महामंडळाकडून कारवाई अपेक्षित.

  • कायद्याची राहिली नाही भीती, गोळीबार करणाऱ्या आरोपींची जामनेर पोलीसांकडे शरणागती.

  • पाचोरा बसस्थानक गोळीबारातील जखमी आकाश मोरेचा जागीच मृत्यू.

  • पाचोरा बसस्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार, एक गंभीर जखमी.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्कूलबस व दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी.

राजकीय
Home›राजकीय›अमोल शिंदेंनी जनतेच्या प्रश्नावर लोकआंदोलन करावीत – अँड.अभय दादा पाटील.

अमोल शिंदेंनी जनतेच्या प्रश्नावर लोकआंदोलन करावीत – अँड.अभय दादा पाटील.

By Satyajeet News
June 9, 2021
606
0
Share:
Post Views: 146
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०६/२०२१

पाचोरा विधानसभेला पराभव झाल्याच्या धक्कातुन अध्याप अमोल शिंदे विसरलेले नाहीत. आ. किशोर पाटील यांनी करोना काळात आपल्या मतदार संघात किराण्यापासून ते औषधांपर्यंत तसेच रेमडेसेवीर पासून फ्रंट लाईन वर्कर्स यांच्यासाठी उकडलेले अंडे पोहाचविण्यापर्यंत आ. किशोर पाटलांनी रात्रीचा दिवस करून परिश्रम घेतले.

तसेच पाचोरा भडगाव मतदार संघात विकास कामांचा तुफान मेल सुसाट ठेवली या सर्व गोष्टीमुळे भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत आता आपली डाळ शिजणार नाही. यामुळे अमोल शिंदे यांना प्रचंड अस्वस्थत वाटत असून आमदारांच्या वेगवान कामगिरीमुळे काही विरोधकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे त्यांना आता चांगल्या मानसोपचार तज्ञाकडून उपचार करुन घेण्याची गरज आहे. असा खोचक टोला अँड. अभय पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत लगावला. यावेळी किशोर बारावकर,शरद पाटील, गणेश पाटील ,दिनकर देवरे ,चंद्रकांत धनवडे आदी उपस्थित होते.

भाजपचे तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांनी आ. किशोर पाटील यांच्यावर बेताल, बेछूट तथ्यहीन आरोप केलेले आहेत. मतदार संघाचा कोणताही अभ्यास न करता आमदारावर केलेले बिनबुडाचे आरोप हास्यास्पद आहेत. अमोल शिंदे यांनी किशोर पाटील यांना दुधाच्या भावासंदर्भात जाब विचाराने म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. सन २०२० मध्ये भाजपने जिल्ह्यात दुध दर वाढीच्या संदर्भात आंदोलन केले.
अमोल शिंदे यांनी आरोप करतांना वीज मंडळाकडे मागील करोना काळात ऑइल व साहित्य नसतांना अप्पांनी काय प्रयत्न केले असा बाळबोध प्रश्न केला आहे. अमोल शिंदे यांना अध्यक्ष होवून खूप कमी कालावधी झालेला आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेतर्फे विनंती कि त्यांनी अगोदर मतदार संघासोबतच महाराष्ट्राच्या दैनंदिन समस्याबाबत अगोदर सखोल अभ्यास करावा २०१४ पासून ते २०१९-२० पर्यंत भाजपच्या फडणवीस सरकारने जो कर्जाचा प्रचंड डोंगर उभा करून ठेवला त्यामुळे ३१ मार्च, २०२० ला महाराष्ट्राच्या वीज कंपनीला २६१७१७७ लाख रुपये इतका तोटा झाला होता. त्यामुळे वीज कंपनी आजपर्यंत स्वताला सावरू शकली नाही. अशात मोदींनी महाराष्ट्राच्या हक्काचे GST चे हजारो कोटी रुपये दिलेले नसल्याने व सत्ता स्थापने नंतर लगेचच करोना आजाराने विळखा घातल्यामुळे ठाकरे सरकारला मागील सरकारने केलेला कर्जाचा डोंगर फोडून वीज मंडळासाठी व इतर उपाय योजनासाठी काम करता आलेले नाही. भाजप सरकारने केलेले हे कर्जाचे पाप लपविण्यासाठी किशोर आप्पांवर बेछूट आरोप करण्याचे उद्योग अमोल शिंदे करीत आहेत.

किशोर आप्पा यांनी आपल्या मतदार संघातील मागण्यांच्या संदर्भात वेळो वेळी सरकारकडे दाद मागितलेली आहे. त्यांच्या लढवय्या व आक्रमक कार्य शैलीमुळे अमोल शिंदे यांची विचार शक्ती नष्ट झालेली आहे. आपण आता मागील निवडणुकीसारखे करोडो रुपये वाटून देखील आमदार होवू शकत नाही. हे सत्य पचविणे अमोल शिंदे यांना फार अवघड होत आहे. तालुका भाजप मध्ये अमोल शिंदे यांच्या विरोधात जुन्या पदाधिकार्यांचा गट सक्रीय झाल्यामुळे आपले अस्तित्व पक्ष श्रेष्टीपुढे दाखविण्यासाठी जनतेच्या प्रश्नावर सरकारशी रस्त्यावर भांडण्यापेक्षा अमोल शिंदे पत्रकार परिषदा घेत आहेत. असा आरोप अभय पाटील यांनी यावेळी केला.

पाचोरा शिवसेनेतर्फे वीज मंडळाच्या गैर व अनागोंदी कारभाराच्या विरुद्ध तीव्र आंदोलन केले गेले. पाचोर भडगाव मतदार संघातील विरोधक जर समर्थ व सक्षम असते व मतदार संघातील जनतेप्रती त्यांना आपल्या जबादारीची जाणीव असती तर बंद खोलीत एसीमध्ये बसून पत्रकार परिषदेमध्ये भीमदेवी थाटात गर्जना करण्या ऐवजी रस्त्यावर उतरून लोकांचे विजेसंदर्भात प्रश्न मांडले असते. अमोल शिंदे हे पाचोरा भडगाव तालुक्यात रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही तर ते थेट मुंबई, जळगाव सारख्या ठिकाणी पक्षाने केलेल्या कार्यक्रमात आयते सहभागी होतात. शिंदेच्या या धडपडी बद्दल शिवसेनेला त्यांची कीव येते. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

अंबे वडगाव ग्रामस्थांच्या मागणीला आले यश कोकडी ...

Next Article

एरंडोल तालुक्यातील तळई येथे वीज कोसल्याने दोन ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedराजकीय

    ईव्हीएम मशीनवर बटनाचे जागी पांढऱ्या कागदावर निवडणूक चिन्हे पुसट व लहान आकाराची असल्याने मतदात्यांची उडाली भंबेरी.

    January 16, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    दुसऱ्यांच्या ऐकून झाल्या गप्पा, आता आमचा नेता किशोर आप्पा, अमोल शिंदेंना दे धक्का, विठ्ठलाच्या साक्षीने अनिल शिंदेसह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश.

    July 4, 2023
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा नागरपालीका शिवसेना स्वबळावर लढविणार ‘किशोर बारवकर शिवसेना शहरप्रमुख पाचोरा’

    November 9, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा तालुक्यातील सांगवी प्र.लो. ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध.

    December 30, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    शेंदुर्णीत शिवसेना शाखेचे उद्घाटन.

    August 7, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    लोहारी येथील गाळे बांधकामाबाबत केलेल्या तक्रारी व आरोप हे राजकीय व्देषापोटी. प्रवीण पाटील.

    September 7, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • सांस्कृतिक

    पाचोरा येथे स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान चित्रफितीचे प्रकाशन.

  • शैक्षणिक

    सत्यवान महाजन यांचा, सेवापुर्ती निमित्त गौरव.

  • Uncategorized

    कळमसरा ते कुऱ्हाड दरम्यान सोनद नदीवरील पुल वाहून गेल्याने पंचक्रोशीतील नागरिकांचे हाल.

दिनदर्शिका

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज