सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोर्यात कॉग्रेस कडुन शिवसेना आमदाराचा निषेध, सत्तेत असतांना कृ.उ.बा. समितीच्या प्रशासक पदासाठी कॉग्रेस ला डावलले.

पाचोर्यात कॉग्रेस कडुन शिवसेना आमदाराचा निषेध, सत्तेत असतांना कृ.उ.बा. समितीच्या प्रशासक पदासाठी कॉग्रेस ला डावलले.

By Satyajeet News
May 31, 2021
210
0
Share:
Post Views: 35
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०५/२०२१

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असुन यात कॉंग्रेस हा मुख्य घटक पक्ष असून कृ.उ.बा.प्रशासक पदावर कॉग्रेसला डावलण्याचे काम शिवसेनेचे आमदार पाटील यांनी केल्याने कॉग्रेस पदाधिकारी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. पालकाने पालक व्हावे बालक होऊ नये असा इशारा पत्रकार परिषदेत केला.

महाविकास आघाडीच्या सरकार चे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे हे प्रमुख आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून कॉग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे काम करीत आहेत. असे असतांना पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे आमदार किशोर पाटील हे आघाडीचे प्रमुख आहेत. म्हणजेच पालक आहे. पंरतु काहीं घटना अशा घडल्या की पालक पालकासारखे न वागता बालकासारखे वागत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले की पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ बरखास्त झाले यासाठी अॉगस्ट २०२० मध्ये पाचोरा विश्राम गृहात एक गोपनिय बैठक शिवसेनेचे आमदार किशोर पाटील व राष्ट्रवादी चे माजी आमदार दिलीप वाघ यांनी केली आणि यात त्यांनी दोघा पक्षांचे प्रशासक म्हणून कोणते पदाधिकारी घ्यायचे हे ठरवले त्यानंतर यालाही शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी तिलांजली देत स्वतः च्या पक्षाचे १८ पदाधिकारी यांची यादी दि. १४ अॉगस्ट २०२० रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना स्वतःच्या लेटरहेडवर शिफारस केल्याचे आमदार पाटील यांचे लेटरहेड पत्रकार परिषदेत पुरावे म्हणून दाखवले मात्र तत्कालीन संचालक मंडळ उच्च न्यायालयात गेल्याने त्यांना स्थगिती मिळाली म्हणून हा विषय जैसे थे थांबला मात्र पुन्हा शासनाने संचालक मंडळ बरखास्त केले म्हणून दि. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या सह पाच लोकांची यादी पाठवली यावेळी कॉग्रेस हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असतांना आम्हाला विश्वासात नघेता कॉग्रेसला डावलण्याचा प्रकार केल्याने याचा आम्ही निषेध करतो असे श्री. सोमवंशी यांनी सांगितले ते म्हणाले की आमदार किशोर पाटील यांनी महाविकास आघाडीत ठीणगी पाडु नये कारण याचा वनवा महाराष्ट्रात पेटेल आणि महाविकास आघाडीचे प्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना त्रास होईल.असे करु नये अशी आमची अपेक्षा आहे.

महाविकास आघाडीचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सह कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले आणि जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांना देखील या बाबतीत ची लेखी तक्रार केली आहे. नवीन प्रशासक मंडळात अल्पसंख्याक समाजातील लोकांना डावलले हे देखील महत्त्वाचे आहे येणाऱ्या काळात आमदार पाटील यांनी कॉग्रेस ला दुजाभावाची वागणूक देऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण,जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, शिवराम पाटील, महिला आघाडीच्या शिला सुर्यवंशी, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले आदी उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

जळगांव जिल्ह्यात संचारबंदीसह विशेष निर्बंधात १५ जूनपर्यंत ...

Next Article

पिंपळगाव हरेश्वर येथे राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    शिवजयंती निमित्त पाचोरा येथे उद्या भव्य रक्तदान शिबिर.

    February 18, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा येथील शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली यांची जळगाव जिल्हा सदस्य पदी तर ॲडव्होकेट दिपक पाटील साहेब यांची तालुका अध्यक्ष ...

    November 12, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वरखेडी बस स्थानक ते पी.जे. रेल्वे फटका पर्यंतचा डांबरीकरण रस्ता दाखवा बक्षीस मिळवा.

    June 25, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जामनेर तालुक्यातील राखीव जंगलात मोठ्याप्रमाणात वृक्षतोड.

    March 24, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    आपल्या वेदनेला ऊर्जेत रूपांतरित करा ‘ मृत्यू कार’ विनोद अहिरे

    October 30, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    गावाचे ऋण फेडण्यासाठी गजानन पाटील यांनी महादेवाचे मंदिराला दिली लाखाची देणगी.

    December 31, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    पिंपळगाव हरेश्र्वर येथे १७ वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू.

  • Uncategorizedआपलं जळगाव

    अंबे वडगाव परिसरात विद्यूत चोरांची चंगळ तर विद्युत ग्राहकांना मंगळ, विद्यूत चोरांना हप्तेबाज कर्मच्याऱ्याचे अभय.

  • आपलं जळगाव

    भडगाव येथे काटेकोरपणे पालन करत जनता कर्फू यशस्वी.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज