जळगांव जिल्ह्यात संचारबंदीसह विशेष निर्बंधात १५ जूनपर्यंत वाढ, जिल्हाधिकारी मा.श्री.अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आदेश.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०५/२०२१
जळगांव जिल्ह्यात संचारबंदीसह विशेष निर्बंधात १५ जूनपर्यंत वाढ करण्यात आली असून पुढीलप्रमाणे निर्बंध घालण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणारावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जळगाव जिल्हाधिकारी मा.श्री. अभिजित राऊत यांनी दिला आहे.
अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने दररोज सकाळी ७.०० ते दुपारी २.०० या वेळेत सुरु राहतील.
स्वतंत्र ठिकाणी असलेली इतर प्रकारचे सर्व दुकाने ही केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या वेळेत सुरु राहतील.
अत्यावश्यक वस्तू व सेवांबाबत घरपोच वितरण सुविधा ह्या दररोज सकाळी ७.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत देता येतील.
सर्व प्रकारची केश कर्तनालये (सलून), स्पा सेंटर्स, जिम पूर्णपणे बंद राहतील.
अत्यावश्यक कारणांव्यतिरीक्त दुपारी २.०० वाजेनंतर नागरिकांना मुक्तपणे संचार करण्यास बंदी राहील.
कृषी संबंधित सेवा पुरविणारी दुकाने ही दररोज सकाळी ७.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत सुरु ठेवता येतील.
मॉर्निंग वॉक, सायकलींग, खुल्या मैदानातील व्यायाम याकरीता केवळ सकाळी ४.०० ते ८.०० यावेळेतच सुट राहील.
दुकानांच्या प्रवेशाच्या ठिकाणी/काऊंटर समोर एकावेळी 5 पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश राहणार नाही.
नियमांचे उल्लंघन करणारे दुकान मालक/चालक व घटक यांचेकडून रुपये १० हजार दंड आकारण्यात येईल.
आस्थापनांच्या ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी/कामगार यांचे भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (वय वर्षे ४५ वरील) लसीकरण करुन घेणे बंधनकारक राहील. तसेच सदर कर्मचारी/कामगार यांची साप्ताहिक RTPCR चाचणी करुन घेणे बंधनकारक राहील.