पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्था भारत ( पुणे ) यांच्यावतीने समाजसेवक गजानन क्षीरसागर यांना राज्यस्तरीय रुग्णमित्र पुरस्कार प्रदान.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०१/२०२१
महाराष्ट्र राज्यातुन पर्यावरण, सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य क्षेत्रात निस्वार्थी वृत्तीने सेवा देणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील माणुसकी समुहाचे तरुण समाजसेवक गजानन क्षीरसागर यांना आरोग्य क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केल्याबद्दल *राज्यस्तरीय रुग्णमित्र पुरस्कार २०२१* उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. त्यांनी आरोग्य सेवा,मनोरुग्ण सेवा, ग्रामीण भागातील रुग्णाचे २२० ऑपरेशन मोफत केले आहे, त्यामध्ये डिलिव्हरी, सिजरियन, हाडांचे ,जबडा,हरणीया, अपेंडिक्स ऑपरेशन आहेत. वेळोवेळी रक्तदान शिबिर आयोजित करत असतात, त्यामुळे रुग्णांना रक्त पुरवठा करण्यासाठी मोठा दिलासा मिळत आहे. गोरगरीब रुग्णांना मोफत मेडिकल साहित्य पुरवणे व हे कार्य ते निस्वार्थ वृत्तीने करीत आहे या कार्याची दखल घेऊन रुग्णमित्र हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ, सन्मानपत्र, ट्रॉफी असे आहे .
हा पुरस्कार सोहळा ग्रामपंचायत वराडसीम, ता :भुसावल, जि: जळगाव येथे पार पडला.याआधी त्यांना राज्यस्तरीय १४ पुरस्कार व १ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. प्रमुख उपस्थिति पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्था भारत जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष लखन सजोले, केसावर फुगे फेम खानदेशी अभिनेता गायक अण्णा भाऊ सुरवाडे. तसेच लखन सजोले यांना राज्यस्तरीय कोरोना योध्दा पुरस्कार, ध्रुवास राठोड यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, समाजसेवक गजानन क्षीरसागर यांना राज्यस्तरीय रुग्ण मित्र पुरस्कार , प्रदिप पाटील यांना पक्षी मित्र पुरस्कार.तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व लोककलावंत मंडळ ,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.ह्या पुरस्काराने माणुसकी समुहातर्फे व सर्वस्तरातुन गजानन क्षीरसागर यांचे कौतुक होत आहे.