सावखेडा येथील गोळी लागून निधन झालेल्या जवानाचे निवासस्थानी बच्चूभाऊ कडू व सहकाऱ्यांची सात्वनपर भेट.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/११/२०२१
पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील गोळी लागून निधन झालेल्या जवानाचे निवासस्थानी प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा मंत्री मा.श्री. बच्चूभाऊ कडू व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज दुपारी भेट देऊन परदेशी कुटुंबीयांचे सात्वन केले.
सावखेडा येथील स्व.मंगलसींग जयसिंग परदेशी हा जवान आपले कर्तव्य बजावत असतांना पठाणकोट येथे गोळी लागून त्या घटनेत त्यांचे निधन झाल्याची घटना परवा सकाळी घडली होती. या घटनेमुळे पाचोरा तालुक्यावर शोककळा पसरली होती. या घटनेची माहिती मिळताच बच्चूभाऊ कडू व त्यांचे सहकारी, उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी, जिल्हाध्यक्ष विजय भोसले भुसावळ चे नगरसेवक संजय आवटे,जामनेर तालुका अध्यक्ष प्रदीप गायके, जामनेर विधानसभा क्षेत्र प्रमुख मनोज कुमार महाले जामनेर युवक अध्यक्ष मयुर पाटील शेतकरी आघाडीचे अण्णा पाटील अरुण पाटील यांनी सावखेडा येथे येऊन स्व.मंगलसींग परदेशी यांच्या परिवाराची सात्वनपर भेट घेतली. त्यांच्या कुटुंबीयांचे सात्वन करून धीर दिला. आम्ही स्व.मंगलसींग यांच्या अंत्यसंस्कारासाठी येणार होतो परंतु रस्त्याने काही अडचणी आल्यामुळे मी वेळेवर येऊ शकलो नाही अशी खंत मंत्री मा.श्री. बच्चुभाऊ कडू यांनी बोलून दाखवली.
यावेळी सरपंच समाधान वाघ, देवीलाल परदेशी माजी सैनिक, गणेश राजपूत, सुनिल तडवी, अशोक तडवी, मोतीलाल राजपूत, शेखर परदेशी, पो.पा.संजय परदेशी आदी मान्यवर कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
.