सततच्या पावसामुळे छत्री दुरुस्ती व्यवसायाला चांगले दिवस.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०८/२०२१
पावसाळा सुरू झाला म्हणजे आधीच्या काळात घोंगडी व छत्री शिवाय पर्याय नव्हता. परंतु आजच्या प्रगत युगात छत्रीची जागा रेनकोट व इतर साधनांनी घेतली होती.
परंतु आता पुन्हा बरेचसे लोक छत्रीचा वापर करू लागले नेमके यावर्षी सततच्या पावसाने घराबाहेर निघाने मुश्कील झाले असून काही कामानिमित्त बाहेर जातांना बरेचसे लोक छत्रीचा वापर करत आहेत. म्हणून घरात अडगळीत पडलेल्या छत्र्या वापरात काढून त्या दुरुस्ती करुन वापरात आणत आहेत.
तसेच छत्री वापरतांना वादळात किंवा धावपळीत छत्री नादुरुस्त झाल्यास त्या दुरुस्त करून घेण्यासाठी बरेचसे लोक छत्री दुरुस्तीच्या दुकानावर जाऊन दुरुस्ती करून घेत असल्याने छत्री दुरुस्ती करणाऱ्या व्यवसाईकांना चार पैस कमावण्याची संधी मिळाल्याने कोरोना काळात थोड्याफार प्रमाणात आर्थिक बळ मिळाल्यामुळे संसाराची गाडी पुन्हा रुळावर आली असल्याचे दिसते.