सेवाकार्याचा बादशाह डॉ.सागर दादा गरुड- सुधीर पाटील सर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०४/२०२१
सागर म्हणजे समुद्र, जसे आपण समुद्र (सागर) जसजसे आपण जवळ जाऊ तशी ओढ निर्माण करणारा, लांब, लांब पर्यंत नजर टाकली तरी सर्वदूर दिसणारा अथांग सागरासारख मोठ मन असलेला माणूस, नकळत आपल्याला कधीच आपलस करुन घेणारा, सागर किनाऱ्यावर उभे राहतातच पाण्याची एखादी लाट येऊ आपल्या काही कळण्याआधीच अलगद स्पर्श करुन जाते व आपल्याला कुणीतरी मायेने स्पर्श केल्याचा भस होतो असाच एक वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक मिळवून समाजसेवेचा वसा हाती घेतलेल्या माझा जिवलग मित्र म्हणजे डॉक्टर सागर गरुड याज या अष्टपैलू असलेल्या मित्राचा वाढदिवस त्यानिमित्ताने मी लिहिलेले दोन शब्द आपल्या समोर ठेवत आहे.
सार्वजनिक जीवनात जगत असताना विविध क्षेत्रात माझ्या मैत्रीचा गोतावळा निर्माण झाला. त्यातीलच मित्रांचा एक विचार “एकीच्या” माळेत गुंफणारे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉक्टर सागर दादा गरूड. वैद्यकीय समाज आपल्या कार्यकर्तृत्वाने समाज मनावर सकारात्मक ठसा उमटवणारे डॉक्टर सागर गरूड एक सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व आहे.
कुटुंबासाठी प्रेमळ मित्रांसाठी आपुलकी असणारा दुष्काळ या काळात सर्वांना आर्थिक मदतीसाठी धावून जाणारा हा चेहरा जिल्ह्यातील सर्वांना भावत आहे. वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. शासनाच्या वेगवेगळ्या योजना त्यांनी आपल्या विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल पाचोरा येथे आणून एकवून खूप मोठे कार्य केले आहे. त्या बाबतीत वैद्यकीय सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार देखील त्यांना मिळाले आहे. अनेक उल्लेखनीय कामे केली. परंतु केलेल्या कामाचा त्यांनी कधीच प्रसिद्धीसाठी वापर केला नाही. मानवी जीवनात भेट आणि विवेक या दैनंदिन गोष्टी असल्याचा माझा समज आहे. माझ्या सुदैवाने डॉ सागर दादा गरुड यांची व माझी भेट झाली आणि मी डॉक्टर साहेबांचा चाहता कधी बनलो ते कळलेच नाही.
शैक्षणिक ,सामाजिक ,राजकीय वैद्यकीय, क्षेत्रातील माझ्या आयुष्याच्या वळणावर अनेक प्रकारची अनुभव देणारी चरित्र मला भेटत गेली. अनेकांपैकी जे काही चांगले सकारात्मक अनुभव देणारी चरित्र ममला सदा सर्वकाळ आठवण येत आहेत. त्यातील एक अनमोल आणि कर्तुत्ववान नाव म्हणजे आदरणीय डॉ. सागरादादा गरुड मित्राचा मित्र कर्तृत्व समता चेतन अशा अनेक गोष्टींचा अर्थच या व्यक्तीकडून लक्षात येतो त्या व्यक्तीचे नाव आहे “डॉ. सागर दादा गरुड”.
मी मागील पाच वर्षापासून पाहतोय एक आश्वासक आणि शब्दाला जागणारा, पायाला भिंगरी बांधून तळागळातील जनतेसाठी धावून जाणारा, सेवाकार्यांचा, बादशाह नेतृत्व म्हणजे डॉ.सागर दादा गरुड थोर “मोण्याचा” सहवास लहानशी जवळीकता युवकांची मैत्री आणि सर्व जाती धर्माचे आपुलकीचा भावना जपणारा हा त्यांचा गुण सर्वांनाच भावतो. माझ्या जीवन प्रवासाचा मधील एक चांगली व्यक्ती होता म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. दिलदार मनाचा राजा माणूस हा शब्द त्यांना शोभतो. मित्रांसाठी दिलेल्या शब्दांसाठी डॉ. सागर दादा गरुड काही पण करू शकतात.
कोरणा महामारीच्या संकटाने संपूर्ण जगाला ग्रासलेल आहे. संपूर्ण देशासह महाराष्ट्रातहीया आजाराने लाखो लोक बांधीत झाले आहेत अशा परिस्थितीमध्ये डॉ. सागर दादा गरुड आपली जबाबदारी यशस्वीपणे व निष्ठेने पार पाडत आहेत. डॉ. सागर दादा गरुड शेंदुर्णी जामनेर येथील मूळ रहिवासी असून पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल संचालक आहेत. डॉ. साहेबांचे कोरोना काळातील कार्य पाचोरा सह जामनेर तालुक्यातील चर्चेचा विषय ठरत आहे. परिसरातील तरुण त्यांना आपला आयडल मानत असून रियल हिरो कारोना योद्धा म्हणून संबोधत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करून आपले कर्तव्य बजावून सोबतच लॉकडाऊन काळात ग्रामीण भागातील मजुरांचा रोजगार फोडल्याने गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ व त्यांना सहकार्याचा हेतूने डॉ. सागर दादा गरुड यांच्यातर्फे शेंदुर्णी येथील २५० कुटुंबांना किराणा किटचे वाटप केले. यात तेल, डाळ, तांदूळ ,साखर ,चटणी, मीठ ,डाळ ,आदी वस्तूंचा समावेश होता.
शेंदुर्णी परिसरातील लोकांसाठी दररोज सकाळ संध्याकाळ तीनशे लोकांच्या जेवणाची मोफत व्यवस्था डॉ.साहेबांनी केली. हा उपक्रम डॉ. साहेबांनी तब्बल दोन महिने राबविला, शेंदुर्णी परिसरातील गावांसाठी मोफत सॅनिटायझर, मास्क वाटप यासह मोफत ॲम्बुलन्स सुविधा उपलब्ध करून दिली. अशा स्वरूपाच्या समाजपयोगी उपक्रम सोबत तालुक्यातील कुर्हाड खुर्द गावात सहकाऱ्यांच्या मदतीने ५०० कुटुंबात मोफत किराणा किटचे वाटप केले.
वैद्यकीय क्षेत्रातील कार्यासह समाज हिताचे विविध उपक्रम राबवत डॉ. सागर गरुड हे समाज बांधिलकी जपत आहेत त्यामुळे प्रशासकीय सामाजिक, राजकीय व वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
,,शब्दांकन तथा लेखन,,
श्री.सुधीर पाटील (सर) कुऱ्हाड खुर्द