वाढदिवसाच्या निमित्ताने प्रशांत गवळी तर्फे मास्क व सॅनिटायझर चे वाटप.
नारायन जगताप.(तारुखेडले)
दिनांक~०६/०५/२०२१
निफाड तालुक्यातील तारुखेडले येथील नवतरुण मा.श्री. प्रशांत गवळी यांचा येत्या ०८ मे शनिवारी वाढदिवस आहे. परंतु सगळीकडे कोरोनाची लाट पसरली असल्याने आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना उराशी बाळगून आपल्या वाढदिवसाच्या दिवशी केक, सजावट व इतर खर्च न करता वाढदिवसाच्या निमित्ताने गावात आगळावेगळा उपक्रम राबवणार आहे.
यात दिनांक ०८ मे शनिवारी प्रशांत गवळी यांचा वाढदिवस आहे. परंतु काही कारणास्तव सामाजिक अंतर राखत व लॉकडाऊच्या नियमावलीचे पालन करत गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांना दिनांक ०६ गुरुवारी मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप करुन जमलेल्या ग्रामस्थांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती देऊन जनजागृती केली. प्रशांत गवळी यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.