जामनेर तालुक्यातील लिहा येथील एका २० वर्षीय युवकाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०१/२०२१
एका बाजूला स्री शक्तीचा जागर सुरु असतांनाच दुसरीकडे जामनेर तालुक्यातील एका खेडेगावात महिलेवर बलात्काराची घटना घडल्याने तालुक्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून आरोपीला कडक शासन व्हावे अशी मागणी केली जात असून या घटनेचा निषेध केला आहे.
शेंदुर्णी येथून जवळच असलेल्या लिहा येथील बबलू उर्फ अतुल राजाराम चव्हाण. वय २० या युवकाने पिडीतेस घरी बोलावून इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करून समाजात बदनामी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार पहुर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर २०२१ कलम ३७६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक निरीक्षक किरण बर्गे करीत आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.